ECI | LOCAL BODY ELECTION: निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न

63 0

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या जिल्हा दरसूचीच्या दर निश्चितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक खर्चाच्या वापरण्यात आलेली दरसूची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकात वापरण्यास सहमती दर्शविण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नोडल अधिकारी डॉ. चारुशिला देशमुख, नगर विकास शाखेच्या प्रभारी जिल्हा सह आयुक्त अँलिस पोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विशाल पवार, कोषागार अधिकारी देवराम शेळके यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकाकरिता आजच्या बैठकीत मान्य करण्यात आलेली दरसूची राजकीय पक्षांना कळविण्यात येईल. या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले.

आज सकाळी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या अनुषंगाने नियुक्त संबंधित विषयांचे नोडल अधिकारी यांच्या कामकाजाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आढावा घेवून त्यांना सूचना दिल्या.

Share This News
error: Content is protected !!