KOLHAPUR CITY LEOPARD VIDEO: कोल्हापुरातील नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याची FULL STORY

70 0

पुणे,नाशिक जिल्हापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातही बिबट्याने हैदोस घातला.. कोल्हापूर शहरातील भरवस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.. या बिबट्याने हॉटेल कर्मचारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानंतर या बिबट्याला कसं जेरबंद बंद करण्यात आलं.. पाहुयात हा थरारक घटनाक्रम..

शनिवारी रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरात काही वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आलं होतं. सुरुवातीला तो परिसरातील झाडीत दिसला आणि काही वेळाने तो थेट विवेकानंद कॉलेजजवळील वूडलँड हॉटेलमध्ये घुसला. उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.वन विभागाचे अधिकारी या बिबट्याचा शोध घेत होते..हॉटेलमध्ये प्रवेश करताना बिबट्याने एका बंगल्याच्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारली आणि थेट हॉटेलच्या बागेत शिरला. त्या वेळी बागेतील माळी काम करत होता. बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली, यात माळी किरकोळ जखमी झाला. त्यानंतर बिबट्याने हॉटेलमधील प्लेट धुत असलेल्या निखील कांबळे या युवकावरही हल्ला केला. तो सुदैवाने बचावला पण जखमी झाला आहे.यानंतर बिबट्या वूडलँड हॉटेलमधून बाहेर पडून शेजारी असलेल्या बीएसएनएल कार्यालयात गेला. तिथून तो थेट महावितरण कार्यालयात घुसला आणि एका चेंबरमध्ये लपला. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, मात्र बिबट्याला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर त्याने हल्ला केला. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही.या घटनेनंतर वनविभागाने परिसर सील करून बिबट्याचा शोध सुरू केला आहे.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्या बसलेल्या चेंबरच्या सभोवती जाळ्या लावून इतर जाळ्या लोखंडी गार्ड काठी सह मोठे पथक चेंबर जवळ आले. बिबट्याला हुसकावताच बिबट्या बाहेर आला आणि त्याने पथकावर झडप घातली पण जाळी गार्डसहसर्वानीच त्याला खाली पाडून दाबून धरले आणि बंदुकीने गुंगीचे इंजेक्शन दिले. थोड्या वेळाने बिबटयाची हालचाल मंदावली आणि गुंगीने निपचित पड़ला. त्याला जाळीसह उचलून वनखात्याच्या व्हॅन मधून नेण्यात आले. आणि परिसरातील नागरीकांनी शासकिय यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.

पुणे नाशिक जिल्ह्यासह कोल्हापूर मध्ये ही बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर पाहायला मिळतोय.. कोल्हापुरात बिबट्याने घातलेल्या हैदोसनंतर सर्व नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.. नाशिक पुणे आणि कोल्हापूर मधील बिबट्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जाते..

Share This News
error: Content is protected !!