PUNE BHIGWAN NEWS: Friendship on Facebook, posing as a police officer, physical relations and a fraud worth lakhs — a shocking case

PUNE BHIGWAN NEWS: फेसबूकवर मैत्री, पोलीस असल्याचा बनाव, शरिरसंबंध अन् लाखोंचा गंडा, चक्रावून सोडणारं प्रकरण

109 0

PUNE BHIGWAN NEWS: फेसबुकवर मैत्री करून, स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं सांगत, महिलांना विश्वासात घेऊन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला भिगवण पोलिसांनी अटक केली आहे.गणेश कारंडे असे या (PUNE BHIGWAN NEWS) आरोपीचे नाव असून, त्याने सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांशी ओळखी केल्या, शरीरसंबंध ठेवले आणि पैसे व दागिने घेऊन फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Parth Pawar Land Scam: पार्थ पवारांचा ‘जिजाई’ बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?

भिगवण पोलीसांच्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील श्रीपुर येथील गणेश शिवाजी कारंडे या युवकाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ‘संग्राम पाटील’ आणि ‘पृथ्वीराज पाटील’ अशी बनावट प्रोफाईल्स तयार केली होती.सोशल (PUNE BHIGWAN NEWS) मीडियावर महिलांशी ओळख करून, तो स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं भासवत असे. मदतीच्या नावाने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. मग शरिरसंबंध,पैशांची देवाण घेवाण, दागिने यांच्यावर डल्ला मारायचा. हे सर्व मिळालं की हा पठ्ठ्या फरार होवून जायचा. एका महिनेने तक्रार केली अन् अगदी चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने हा ठग जाळ्यात अडकला. पुण्याच्या भिवगवण पोलीसांनी ही कारवाई केली. त्याला पुण्याच्या भिगवण पोलिसांनी अकलूज मधून बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे एका पिडीत महिलेला ब्युटी पार्लरसाठी 6 लाखांचे लोन मिळवून देतो असे आमिष दाखवून,तिला अकलूजजवळील (PUNE BHIGWAN NEWS) मदानवाडी येथील लॉजमध्ये नेण्यात आले. तिथे तिच्या अंगावरील तिळ व खुणा बँकेच्या कागदांसाठी लागतात असे सांगत दमदाटी करून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले.आणि तिच्याकडील मंगळसूत्र, कानातील टॉप्स, मोबाईल आणि रोख पैसे असा 73 हजारांचा मुद्देमाल पळवला.

PUNE BHIGWAN NEWS : फेसबूकवर मैत्री, पोलीस असल्याचा बनाव, शरिरसंबंध अन् लाखोंचा गंडा 

या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.गुप्त बातमीदाराच्या मदतीने अकलूज परिसरातून आरोपीला जेरबंद करण्यात आले.विशेष म्हणजे, या आरोपीवर अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर आणि लोणंद पोलीस ठाण्यांत याआधीही अशाच गुन्ह्यांची नोंद आहे.या कारवाईचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी केले असून,भिगवण पोलीस पथकाने तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!