ChatGPT said: Pune Land Scam: Another land scam in Pune; 5-acre Agriculture Department land involved

Pune Jamin Ghotala: पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा; कृषी विभागाच्या 5 एकर जमिनीचा घोटाळा

130 0

Pune Jamin Ghotala: पुण्यातच नुकताच पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहाराचं प्रकरण राज्यभरात गाजत असताना,आता शीतल तेजवानी व दिग्विजय पाटील यांच्या आणखी (Pune Jamin Ghotala) एका जमीन व्यवहाराचा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. कृषी खात्याच्या ताब्यात असलेली तब्बल 5 एकर सरकारी जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तहसीलदारांसह एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Jamin Ghotala पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा कृषी विभागाच्या 5 एकर जमिनीचा घोटाळा

पुण्यात वाढत असलेल टोळी युद्ध, जमीन व्यवहार, आणि जमीन माफियांचा दबदबा यामुळे पुणेकर त्रस्त झालेत. स्थानिक यावर आपलं मत व्यक्त करताना म्हणत आहेत, राजकीय वरदहस्ताशिवाय एवढं (Pune Jamin Ghotala) धाडस करणं शक्यच नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडी परिसरातील ही जमीन 1883 पासून कृषी खात्याच्या ताब्यात होती. शासनाच्या नोंदीत जमीन स्पष्टपणे कृषी विभागाची असल्याचा उल्लेख असूनही,या जमिनीची खाजगी मालकी दाखवण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले. हा प्रकार मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 च्या नियमांना सरळ धुडकावून करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

JARANGE PATIL:जरांगे पाटील हत्या कट प्रकरण,जरांगे पाटलांची पत्रकार परिषद 

या दोघांनी यापूर्वीही सेवा विकास बँकेकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे 41 कोटींचे कर्ज काढल्याचं समोर आलं होतं.सागर सूर्यवंशीला याप्रकरणी सीआयडी, ईडी आणि पिंपरी-चिंचवड (Pune Jamin Ghotala)  पोलिसांनी अटक केली होती.शीतलला मात्र अटकपूर्व जामीन मिळाला होता. आता या जमीन बळकावण्याच्या प्रकरणातही शीतल तेजवानीचं नाव पुन्हा समोर आलं आहे.

निकालापेक्षा सर्वोत्तम खेळावर भर द्या; खासदार क्रीडा महोत्सवातील टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या सर्व 9 जणांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कारभार 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 दरम्यान चालू होता, असे तपासातून उघड झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!