1800 कोटींची जमीन 300 कोटींना; पार्थ पवारांना अडचणीत आणणारं जमीन विक्री प्रकरण नेमकं काय?

93 0

 

नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय 1800 कोटींची जमीन पार्थ पवार यांना 300 कोटी देण्यात आली असा दावा दानवे यांनी केलाय

पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरून व्यवहार करण्यात आले असा सुद्धा आरोप दानवे करत आहेत. कोरेगाव पार्क आयटी आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे. असा आरोप करताना त्यांनी उल्लेख केलाय की एक लाखाचा भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य झालं ?हा सवाल दानवेंनी उपस्थित केलाय . 48 तासांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ तर 27 दिवसांमध्ये व्यवहार पूर्ण झाल्याचा दावा असाही आरोप दानवे यांनी केला आहे . यासंदर्भात अंबादास दानवे यांनी एक ट्विट केला आहे ते आपण सविस्तर पाहूया.

अंबादास दानवे लिहित आहेत मेवाभाऊंच्या राज्यांमध्ये 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी होते आणि स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमिडीया कंपनीचे भांडवल मूल्य केवळ एक लाख रुपये इतक आहे. कंपनीला 800 कोटी बाजार मूल्य असलेली जमीन 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगाव. कोरेगाव पार्क मध्ये चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची सुद्धा तयारी सुरू आहे . एक लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य होतं ? अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी ही माफ करून टाकली . कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार पूर्ण झालाय. चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी आहे फक्त 500 रुपये. सामाजिक कार्यकर्ते अंजली नमन या यांनीही या प्रकरणांमध्ये ट्विट केलंय अजित पवारांची ही केस एकनाथ खडसे सारखीच नाही का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यावर कारवाई करणार का? पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेल्या (amadea holding LLP) अमेडा होल्डिंग एलएलपी नावाच्या कंपनीने १८०४ कोटींची महार वतनाची जमीन 300 कोटींना घेतली. या व्यवहारात दोन दिवसात स्टैम्प ड्युटी देखील माफ करण्याचे आदेश आले? मुख्यमंत्र्यांनी आणि महसूलमंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे महार वतनाची जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येत नाही अस ट्विट केलं आहे

Share This News
error: Content is protected !!