PUNEET BALAN GROUP: पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५२ वी ज्युनिअर राज्यस्तरीय ज्यूडो क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र ज्यूदो संघटना व जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी असोसिएशनतर्फे दि. १ नोव्हेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित करण्यात आली असून. स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० जिल्हयाचे सुमारे ३५० खेळाडू व ८० संघ व्यवस्थापक, कोच, मॅनेजर, पंच सहभागी झाले आहेत (PUNEET BALAN GROUP) काल स्पर्धेचा पहिला दिवस होता.

PUNEET BALAN GROUP: पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत 52 वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे जळगावात शानदार उद्घाटन

245 0

PUNEET BALAN GROUP: पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५२ वी ज्युनिअर राज्यस्तरीय ज्यूडो क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र ज्यूदो संघटना व जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी असोसिएशनतर्फे
दि. १ नोव्हेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित करण्यात आली असून.

स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० जिल्हयाचे सुमारे ३५० खेळाडू व ८० संघ व्यवस्थापक,

कोच, मॅनेजर, पंच सहभागी झाले आहेत (PUNEET BALAN GROUP) काल स्पर्धेचा पहिला दिवस होता.

DJ मुक्त गणेशोत्सव संकल्प चांगला; मंडळं तयार होतील डिजेमुक्त व्हायला? Special Interview | Punit Balan

महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि जळगाव जिल्हा ज्यूदोचे अध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्या सहकार्याने या स्पर्धा सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या या स्पर्धेमुळे खेळाडूंना ज्यूदो खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून

ज्यूदोचा प्रसार देखील होण्यास मदत होत आहे.
PUNEET BALAN GROUP GANESHOTSAV KASHMIR: पुढील वर्षीपासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूमधाम

स्पर्धा महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक व सचिव दत्ता आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून

स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते काल करण्यात आले.

PUNEET BALAN GROUP GANESHOTSAV KASHMIR: पुढील वर्षीपासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूमधाम

याप्रसंगी महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे शैलेश टिळक, जैन इरिगेशन चे रवींद्र धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य ज्यूदो असोसिएशनचे खजिनदार

रवींद्र मेटकर, पारोळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण, गणेश शेटकर, संचालक अनिल देशमुख, महेश पाटील आंतरराष्ट्रीय पंच

विजय यादव, टुर्नमेंट डायरेक्टर अमोल देसाई , राज्य सॉफ्ट बॉल संघटनेचे सचिव व शिव छत्रपती अवार्ड विजेते प्रदीप तळवेलकर,

टेक्निकल मेम्बर अतुल बामनोदकर, सचिन देवळे,वृषाली लेग्रस महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन चे उपाध्यक्ष

ऍड. विकास पाटील, तांत्रिक समिती अध्यक्ष दर्शना लखानी आदी उपस्थित होते.

उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती पाटील व महेश पाटील यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सचिव डॉ उमेश पाटील,

योगेश महाजन, अतुल गोरडे, अजय काशीद, डिंगबर महाजन, सचीन वाघ, डॉ चांद खान,

अशफाक शेख,पदाधिकारी जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी संघटना हे परिश्रम घेत आहेत. दरम्यान ,

उद्या या स्पर्धेचा समारोप होणार असून या प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ,राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार , सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम , खासदार स्मिता वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

Share This News
error: Content is protected !!