राज ठाकरेंच्या नातवाचं नामकरण ; काय ठेवलं नाव ? काय आहे नावाचा अर्थ ? वाचा…

711 0

मुंबई- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आज या नव्या पाहुण्याचा नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली बोरुडे यांना अलीकडेच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. या चिमुकल्याचं नावं ‘किआन’ असं ठेवण्यात आलं आहे.

‘किआन’ या नावाचा अर्थ देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असा आहे. कियान हे हिंदू धर्मातील नाव आहे. कियानची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे. या सोहळ्यासाठी केवळ घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दरम्यान राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असणार यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक चर्चा आणि पोस्टही व्हायरल झाल्या होत्या त्यानंतर आता अखेरीस अमित ठाकरेंच्या पुत्राचा नामकरण सोहळा पार पडला आहे.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे लग्न 2019 मध्ये झाले होते. मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्हीही मुंबईतच आहे. आता राज ठाकरे यांच्यावर ‘आजोबा’ अशी नवी जबाबदारी असणार आहे. शिवतीर्थावरावर नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी राहण्यास आले. याच नवीन घरामध्ये आता कियान खेळताना, बागडताना दिसणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!