ED

महत्वाची बातमी ! देशभरात विविध १८ ठिकाणी ईडीची छापेमारी

462 0

नवी दिल्ली- ईडीनं आज देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. झारखंड, हरियाना, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये १८ ठिकाणी शुक्रवारी सकाळी ईडीनं मोठी कारवाई केली.

रांची येथील पल्स हाँस्पिटल, पंचवटी रेसिडेंट, कांके रोड, चांदनी चौक, हरिओम टॅावर येथे ईडीने छापेमारी केली आहे. झारखंडच्या खनिज आणि भूवैज्ञानिक विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांचीही चौकशी ईडी करत असल्याची माहिती समोर आली आहे. गौण खनिजमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली होती, त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.

रांचीच्या पल्‍स हॉस्पिटलमध्ये ईडीचे पथक पोहोचले. या ठिकाणी रुग्ण आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही. संपूर्ण परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. झारखंडसह देशात १८ ठिकाणी हे छापेमारी सत्र सुरु असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

झा्रखंडचे कनिष्ठ अभियंता राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला होता. आपल्या पदाचा गैरउपयोग करुन १८ कोटी रुपयांच्या सरकारी संपत्तीत गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांवर ईडीची नजर पडली असून त्यांना आपल्या कचाट्यात घेण्यास सुरवात केली आहे. पूजा सिंघल आणि उद्योगपती अमित अग्रवाल यांच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकला आहे.

Share This News
error: Content is protected !!