Someshwar Foundation Diwali Initiative: Festive Faral Turns Into Support for Flood Victims

Someshwar Foundation Diwali initiative: फराळ दिवाळीचा; झाला आधार पूरग्रस्तांचा

80 0

Someshwar Foundation Diwali initiative: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि गोडवा पसरवण्याचा सण. या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरात फराळाचे सुवासिक पदार्थ तयार होतात आणि नातेसंबंधांना गोडवा (Someshwar Foundation Diwali initiative) लाभतो. याच भावनेतून सोमेश्वर फाउंडेशन आणि सनीज फूड्स दरवर्षी समाजासाठी एक वेगळी आणि प्रेरणादायी परंपरा जपत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, चविष्ट आणि स्वच्छ फराळ ना नफा, ना तोटा या तत्वावर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश असतो. हजारो नागरिक या उपक्रमात सहभागी होतात आणि आपल्या कुटुंबाच्या दिवाळीला गोडवा देतानाच, समाजसेवेचाही भाग बनतात.

Ganja sheti: बीड मालेगावात गांजाच्या शेतीवर कारवाई अंदाजे 12 लाखांचा गांजा जप्त 

मात्र यावर्षीची दिवाळी थोडी वेगळी ठरली. राज्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळे अनेक भागांत भीषण परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, जनावरांचे निवास उध्वस्त झाले आणि अनेकांच्या संसाराचा गाडा (Someshwar Foundation Diwali initiative) अक्षरशः थांबला. या दुःखद प्रसंगात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा संकल्प सोमेश्वर फाउंडेशन आणि सनीज फूड्सने केला. दिवाळीचा फराळ विक्री उपक्रम समाजसेवेच्या माध्यमात रूपांतरित करून, त्या उत्पन्नातून पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे ठरवले.

LONAND MURDER CASE: मोबाईल वरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, खबर देणारा रूम पार्टनरच निघाला आरोपी

या सामाजिक आवाहनाला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी उत्स्फूर्तपणे फराळ खरेदी करून, आपली दिवाळी गोड करण्यासोबतच पूरग्रस्त बांधवांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला. (Someshwar Foundation Diwali initiative) संकलित झालेल्या निधीतून संस्थेने एकत्रित रक्कम गोळा केली आणि आपला दिलेला शब्द पाळत ती मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत महाराष्ट्राचे संवेदनशील आणि कार्यक्षम मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ) यांची भेट घेऊन, सोमेश्वर फाउंडेशनने ₹५,५५,५५५ रुपयांचा धनादेश त्यांच्या हाती सुपूर्त केला. हा प्रसंग केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, समाजातील एकता, सहानुभूती आणि जबाबदारी यांचे प्रतीक ठरला.

Moshi FDA food and drug testing laboratory: मोशी येथे अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात; ८ महिन्यांत अहवाल स्थानिक पातळीवर मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि सोमेश्वर फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे ही खरी समाजसेवा आहे.” त्यांच्या या शब्दांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड प्रेरणा दिली. सोमेश्वर फाउंडेशनसाठी हा उपक्रम केवळ फराळ विक्रीचा नसून, ‘आनंद वाटण्याचा आणि दु:ख कमी करण्याचा’ प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी संवेदनशील राहणे हीच खरी दिवाळी आहे, हा संदेश त्यांनी दिला. देवाभाऊंच्या कौतुकाची थाप संस्थेला पुढील काळात अधिक जोमाने समाजसेवेसाठी कार्य करण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!