HND Jain Boarding Pune land dispute: पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंग (HND जैन बोर्डिंग) च्या प्रस्तावित विक्रीवरून शहरात तणाव वाढत चालला आहे. हा वादग्रस्त (HND Jain Boarding Pune land dispute) जमीन व्यवहार त्वरित रद्द न झाल्यास २७ ऑक्टोबरपासून मूक आंदोलन (शांततापूर्ण निषेध) सुरू केले जाईल आणि त्यानंतर २९ ऑक्टोबरपासून जैन समाजाचे सदस्य देशव्यापी उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे. या जमीन विक्रीच्या व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप समोर आल्यानंतर हा वाद उफाळून आला. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा आरोप केला, तर केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी यापूर्वीच सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तरीही, दोन्ही बाजूंकडून आरोपांचे सत्र सुरूच आहे.
Beed Gevrai news: वीज कोसळल्याने एक महिला गंभीर जखमी तर दुसरी बेशुद्ध पडली
आज (२६ ऑक्टोबर) जैन बोर्डिंगमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि आचार्य श्री गुप्ती नंदिजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली एका चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना (HND Jain Boarding Pune land dispute) शेट्टी यांनी, विश्वस्तांनी जमीन विक्रीला मंजुरी देताना कायदेशीर नियमांकडे दुर्लक्ष केले, तसेच धर्मादाय आयुक्तांनी देखील सुरुवातीला ही मंजुरी नियमबाह्यपणे दिली असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी विश्वस्तांना हा व्यवहार त्वरित रद्द करण्याचे आवाहन केले. तसे न झाल्यास, आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली विश्वस्तांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. याचबरोबर, राजू शेट्टी यांनी पुणे जिल्ह्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना भावनिक आवाहन केले. जर त्यांचा या व्यवहाराशी खरोखर कोणताही संबंध नसेल, तर त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून उपोषण सुरू होण्यापूर्वी हा व्यवहार रद्द होईल याची खात्री करावी, अशी मागणी त्यांनी केली.
RAJU SHETTY ON JAIN BOARDING: पूर्ण व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार- राजू शेट्टी
आचार्य श्री गुप्ती नंदिजी यांनी यावेळी बोलताना, भविष्यात अशा प्रकारच्या अनियमितता होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारच्या संस्थांसोबत चर्चा केली असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली. त्यानुसार, (HND Jain Boarding Pune land dispute) २७ ऑक्टोबर रोजी समाज मूक मोर्चा काढणार आहे आणि तरीही तोडगा न निघाल्यास २९ ऑक्टोबरपासून देशभरातील जैन बांधवांच्या सहभागाने भूख हडताल (उपोषण) सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. धर्म आणि धार्मिक स्थळाच्या नावाखाली कोणतेही राजकीय हित साधू नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “मंत्री आणि खासदार मोहोळ यांनी या जागेला भेट देऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे, पण समाजात अजूनही संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबर देशभरात मूक मोर्चा आयोजित केला आहे. हा मोर्चा गावागावांतूनही काढला जाईल,” असे आचार्यश्रींनी सांगितले.
या दोन्ही नेत्यांनी माहिती दिली की, हजारो समाजबांधवांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची विनंती करणारी पत्रे पाठवली आहेत. आचार्य श्री गुप्ती नंदिजी यांनी पंतप्रधानांना विशेष आवाहन केले, या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करून सरकारने ही विक्री होऊ नये यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.