फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानं संपूर्ण राज्यात एकचं खळबळ उडाली.. बीड जिल्ह्यातील गरीब कुटुंबातून आलेल्या या तरुणीला डॉक्टर बनवण्यासाठी तिच्या वडिलांनी आणि भावांनी कठोर परिश्रम घेतले.. परंतु डॉक्टर झाल्यानंतर अवघ्या काही वर्षातच या मुलीने मृत्यूला कवटाळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये.. पाहूयात या महिला डॉक्टर आणि तिच्या कुटुंबीयांचा संघर्षमय प्रवास…
आपलं आयुष्य संपवलेली ही तरुण महिला डॉक्टर मुळची बीड जिल्ह्यात राहणारी होती.तिने तिचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले आणि दहावी पूर्ण केल्यानंतर, डॉक्टर होण्यासाठी कठोर परिश्रम केले. NEET परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर, तिने जळगाव मेडिकल कॉलेजमध्ये MBBS मध्ये प्रवेश घेतला..गरीब कुटुंबातून आलेल्या या डॉक्टरच्या वडिलांनी कर्ज काढून आणि पैशांची बचत करून आपल्या मुलीला शिकवलं डॉक्टर बनवलं.. भावानेही शिक्षण सोडून शेतीत हातभार लावला, फक्त बहिणीला डॉक्टर बनवण्यासाठी.तर धाकटा भाऊ अजूनही शिक्षण घेत आहे. ह्या तरुणीने 2022 मध्ये, तीच शिक्षण पूर्ण केलं ती डॉक्टर झाली. कुटुंब आनंदात होते. त्यानंतर तिने साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये 6 महिने सेवा बजावली होती.महिला डॉक्टर ही गेल्या 23 महिन्यांपासून सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करत होती. ग्रामीण भागात सेवेसाठी तिचा बॉन्ड कालावधी पूर्ण होण्यासाठी फक्त एक महिना शिल्लक होता. पण, त्याआधी तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने एकचं खळबळ उडाली..दररोज डझनभर मृतदेहांचे शवविच्छेदन करणारी त्यांची मुलगी इतकी निराश आणि हताश कशी झाली असा प्रश्न तिच्या कुटुंबीयांना पडलाय..महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली तत्पूर्वी तिने तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे दोघे आपल्या आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे डॉक्टर तरुणीने म्हटले होते. तसेच पीएसआय गोपाळ बदने याने आपल्यावर चारवेळा लैंगिक अत्यारा केल्याचेही केल्याचेही तिने नोटमध्ये म्हटले होते. या प्रकरणी आरोपी पीएसआय गोपळ बदने आणि प्रशांत बनकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना सध्या न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे..महिला डॉक्टरच्या चुलत भावाने आरोप केला की तिला खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करण्यास भाग पाडले जात होते. तिने याबाबत पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षकांना पत्र लिहून तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, ज्यामुळे तिला प्रचंड मानसिक तणावात होती.दरम्यान, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रशांत बनकरच्या बहिणीने या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली आहे. तिने दावा केला की काही दिवसांपूर्वी महिला डॉक्टरने तिच्या भावाला लग्नासाठी प्रस्ताव दिला होता. तिला प्रशांतशी लग्न करायचे होते, परंतु तिचा भाऊ त्यासाठी तयार नव्हता.
एका गरीब कुटुंबानं कष्टाने मुलीला डॉक्टर बनवलं…पण अवघ्या तीन वर्षाच्या आतच या डॉक्टर मुलीने स्वतःला संपवलं..डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या कुटुंबांकडून करण्यात आली आहे.. या प्रकरणात पोलीस प्रशासन किती तातडीने या डॉक्टर मुलीला न्याय मिळवून देतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे..