IIT Bombay Hostel Privacy Breach 2025: IIT Bombay Hostel Video Incident Raises Concerns Over Student Privacy and Campus Security

IIT Bombay Hostel Privacy Breach 2025: IIT बॉम्बे हॉस्टेल व्हिडीओ प्रकरण; विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेवर गदा, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

138 0

IIT Bombay Hostel Privacy Breach 2025: मुंबईत शिक्षणविश्वाला हादरवणारी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित शिक्षणसंस्था समजल्या जाणाऱ्या आयआयटी बॉम्बेच्या (IIT Bombay Hostel Privacy Breach 2025) वसतिगृहात विद्यार्थ्यांचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ चोरून चित्रीत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 12 ऑक्टोबर 2025 रोजी आयआयटीच्या हॉस्टेल क्रमांक 14 मध्ये घडली. विद्यार्थ्यांना वसतिगृहातील शौचालय भागात काही संशयास्पद हालचाली जाणवल्या. काही विद्यार्थ्यांनी एका व्यक्तीला चोरून व्हिडिओ रेकॉर्ड करताना पाहिले आणि तातडीने सुरक्षारक्षकांकडे तक्रार केली. संबंधित व्यक्ती राहुल पांडे असल्याचे निष्पन्न झाले. तो आयआयटी बॉम्बेचा माजी विद्यार्थी असून, 2025 मध्येच इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातून एमटेक पूर्ण केल्याचे समजते.

Amazon delivery fraud Diwali: हिंगोलीतील ऑनलाईन फसवणूक: एसीच्या ऐवजी आले लाकडाचे तुकडे!

राहुल सध्या नोकरीच्या शोधात होता आणि कॅम्पस इंटरव्ह्यू प्रक्रियेतील सहभागासाठी तो पुन्हा आयआयटीमध्ये दाखल झाला होता. त्याने एका अधिकाऱ्याच्या शिफारशीनुसार दोन दिवसांचा प्रवेश पास मिळवून (IIT Bombay Hostel Privacy Breach 2025) हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतला होता. त्या कालावधीत तो मित्राच्या खोलीत राहात होता. मात्र, त्याने शौचालयात विद्यार्थ्यांचे खाजगी क्षण चोरून रेकॉर्ड केल्याचे उघड झाले. सुरक्षारक्षकांनी तत्काळ वसतिगृह प्रशासनाला माहिती दिली आणि त्यांनी पवई पोलिसांना कळवले. पोलिसांनी राहुल पांडे याला अटक केली असून, त्याच्या मोबाईल फोनमधून अनेक अश्लील व खाजगी व्हिडिओज मिळाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आयटी कायद्यानुसार आणि गोपनीयता भंगाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरु आहे.

ही घटना अत्यंत निंदनीय असून, देशातील सर्वोच्च शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे या प्रकारावरून दिसते. शिक्षणाच्या मंदिरात अशा अमानवी (IIT Bombay Hostel Privacy Breach 2025) कृत्यांना स्थान मिळणे केवळ कायद्याचा उल्लंघन नाही, तर नैतिकतेलाही काळिमा फासणारे आहे. या प्रकरणामुळे आयआयटी प्रशासनाने आता सुरक्षा व्यवस्था, प्रवेश नियंत्रण आणि वसतिगृहातील सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिस तपासानंतर आणखी किती विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. हे प्रकरण विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकते, त्यामुळे त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट देण्याचीही गरज आहे.

Share This News
error: Content is protected !!