Illegal liquor seizure Bhor: भोर शहरामध्ये गुरुवारी रात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत 280 लिटर अवैद्य देशी हातभट्टी दारू आणि एक सेंट्रो कार ताब्यात घेतली आहे. ही कारवाई भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (Illegal liquor seizure Bhor) अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुरुवारी रात्री सुमारे अकरा वाजता, पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून एक सेंट्रो कारद्वारे देशी हातभट्टी दारू विक्रीसाठी भोर शहरातील शिवतीर्थ चौपाटी येथे आणली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचला.
BHOR POLICE NEWS: भोर पोलिसांच्या कारवाईत 280 लिटर अवैद्य हातभट्टी दारूसह सेंट्रो कार ताब्यात
पोलिसांनी MH 12 DM 3609 या क्रमांकाची सेंट्रो कार थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये 35 लिटर मापाचे आठ कॅन भरलेले देशी हातभट्टी दारू आढळून आले. याशिवाय, दोन रिकामे कॅनही या कारमध्ये आढळले. एकूण (Illegal liquor seizure Bhor) मिळालेली दारू सुमारे 280 लिटर इतकी आहे.
Amazon delivery fraud Diwali: हिंगोलीतील ऑनलाईन फसवणूक: एसीच्या ऐवजी आले लाकडाचे तुकडे!
सदर गाडी ही राहुल अनिल कुंभार (वय 33) या व्यक्तीच्या नावावर असून, तो धनगरवाडी, शिरवळ, जिल्हा सातारा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दारूसह सेंट्रो कार देखील जप्त केली असून आरोपीविरुद्ध (Illegal liquor seizure Bhor) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार हे करत आहेत. अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, सणासुदीच्या काळात अशा कारवायांना गती दिली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे कौतुक केले असून, अशा अनैतिक धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अशा कारवायांचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी होत आहे.