Ratnagiri Warkari School Case: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लोटे येथील एका नामांकित वारकरी शिक्षण संस्थेच्या (Ratnagiri Warkari School Case) संस्थापकावरच अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संस्थापक भगवान कोकरे यांना अटक केली आहे, तर कार्यकारी अधिकारी प्रतेश कदम यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे धार्मिक आणि शिक्षण संस्थांच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक भगवान कोकरे हे जून महिन्यापासून तिचे सातत्याने शोषण करत होते. या निवेदनानंतर खेड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि कोकरे व कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
कोकरे यांच्यावर पॉक्सो (POCSO) कायद्यातील कलम १२ आणि १७ सह भारतीय दंड संहितेतील गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे केवळ रत्नागिरीच नाही, तर संपूर्ण (Ratnagiri Warkari School Case) महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायात आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत संस्थापक भगवान कोकरे यांचे भाजपशी जवळचे संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी “ज्या भाजप नेत्यांनी या संस्थेत येऊन भाषणे केली आणि कोकरेंना पाठिंबा दिला, त्यांना आम्ही आसमान दाखवू,” असा कडक इशारा दिला आहे.
CM DEVENDRA FADANVIS SPEECH ON NAXAL FREE MAHARASHTRA: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
कोकरे यांनी आणखी अनेक मुलींचे शोषण केले असावे, अशी शंकाही जाधव यांनी व्यक्त केली आहे. लवकरच याविरोधात मोठी सभा घेऊन भगवान कोकरेंचा खरा चेहरा जनतेसमोर आणला जाईल, (Ratnagiri Warkari School Case) असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या आळंदी परिसरातही वारकरी संस्थांच्या वसतिगृहांमध्ये बालकांचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील या घटनेने वारकरी शिक्षण संस्थांच्या कार्यपद्धती आणि सुरक्षिततेच्या मानकांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.