Ratnagiri Father Kidnapped for Pension by Son: Son arrested by Ratnagiri Police for abducting father and demanding ransom — a shameful betrayal of family ties

Ratnagiri Father Kidnapped for Pension by Son: नात्याला काळीमा! वडिलांचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या मुलाला रत्नागिरी पोलिसांकडून अटक

142 0

Ratnagiri Father Kidnapped for Pension by Son: रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या (Ratnagiri Father Kidnapped for Pension by Son) सेवानिवृत्त वडिलांना मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशांसाठी एका नराधम मुलाने चक्क त्यांचे अपहरण केले आणि त्यांच्या सुटकेसाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. देवरूख पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या आरोपी मुलाला चिपळूण परिसरातून अटक केली असून, वडिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
Palghar Adivasi Reservation Protest: बंजारा समाजाकडून आदिवासी आरक्षणाच्या दाव्याच्या निषेधार्थ आज पालघरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

संगमेश्वर तालुक्यातील चोरपऱ्या गावात राहणाऱ्या श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय अंदाजे ४५) या आरोपीने हे कृत्य केले. त्याचे वडील दत्तात्रय मराठे (वय ८०) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि (Ratnagiri Father Kidnapped for Pension by Son) त्यांना पेन्शन मिळते. याच पैशांसाठी श्रीकांत वारंवार घरात वाद घालत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सोमवारी रात्री उशिरा श्रीकांतने घरात आई आणि नातीसमोरच आपल्या वडिलांच्या मानेवर सुरा ठेवून त्यांना धमकावले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने टू-व्हिलरवर बसवून तो देवरूख शहराच्या दिशेने पळून गेला.

Double Money in 45 Days:45 दिवसांत दुप्पट परतावा’चं आमिष दाखवत गुंतवणूकदारांना 19 कोटींचा गंडा 

वडिलांचा संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत असतानाच, सकाळी नातीच्या मोबाईलवर वडिलांच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. त्या कॉलमध्ये वडिलांचा हात, पाय आणि तोंड टेपने घट्ट बांधलेला अवस्थेतील धक्कादायक फोटो दिसला. हा फोटो पाठवून आरोपी मुलाने एक लाख रुपयांची खंडणी मागितली आणि खंडणी न दिल्यास ‘आता मागे हटणार नाही’, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

PARBHANI NEWS: विवाहितेवर जडला जीव, कुटुंबीयांचा नकार अन् परभणीच्या तरूणानं उचललं टोकाचं पाऊल

या घटनेने भयभीत न होता, वृद्धाची पत्नी सुनिता मराठे (वय ७४) यांनी धाडस दाखवत थेट देवरूख पोलीस ठाणे गाठले आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी (Ratnagiri Father Kidnapped for Pension by Son) तात्काळ तपासाला सुरुवात केली. तांत्रिक तपासाच्या आधारावर देवरूख पोलिसांनी आरोपी श्रीकांत मराठेचे लोकेशन ट्रेस केले आणि अवघ्या काही तासांतच त्याला चिपळूण परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी अपहृत वडिलांची सुखरूप सुटका केली.

आरोपी श्रीकांत मराठे याच्यावर अपहरण (कलम ३६४ अ), खंडणी (कलम ३८४) आणि जीवे मारण्याची धमकी (कलम ५०६) या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!