Photo Controversy: Ravindra Dhangekar’s Son Prefers Playing with Guns? Photos with Gun Go Viral

Dhangekar Son Viral Photo Controversy: रवींद्र धंगेकरचा मुलगा बंदुकीशीच खेळणार ना? धंगेकरांच्या मुलाचे बंदूकी सोबतचे फोटो होतायेत व्हायरल

106 0

Dhangekar Son Viral Photo Controversy: पुण्यातील शिवसेना महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी निलेश गायवळ गोळीबार प्रकरणावरून भाजपवर सातत्याने टीका करत (Dhangekar Son Viral Photo Controversy) असतानाच, त्यांच्या मुलाचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये त्यांचा मुलगा एका छायाचित्रात कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासोबत दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तो बंदूक हातात घेऊन उभा आहे. या फोटोंमुळे धंगेकरांच्या राजकीय विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे, मात्र धंगेकरांनी याला ‘कौटुंबिक हल्ला’ म्हणत तीव्र आक्षेप घेतला आहे.

MLA ROHIT PAWAR ON BJP: आमदार रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप 

धंगेकर यांनी या व्हायरल फोटोंवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांचा २१ वर्षांचा मुलगा कॉलेजमध्ये शिकत असताना गणपती पाहण्यासाठी गेला होता. (Dhangekar Son Viral Photo Controversy) त्याचवेळी गजा मारणे भेटला आणि मुलाने त्याच्यासोबत सहजपणे फोटो काढला. यामध्ये कोणताही गैरहेतू नव्हता. तर, बंदूक हातात असलेल्या दुसऱ्या फोटोबद्दल बोलताना ते म्हणाले की, “माझा मुलगा काही लिंबू-चमचा घेऊन खेळणार नाही, तो बंदुकीनेच खेळणार.” परंतु, त्यांनी त्वरित स्पष्ट केले की ती बंदूक खरी नसून ‘खोटी’ आहे. ती फुगे फोडण्याची बंदूक आहे आणि अशा आणखी दोन-तीन बंदुका त्यांच्या घरी आहेत. या फोटोंच्या आधारे भाजपने केलेला हा ‘कौटुंबिक हल्ला’ असून, कुटुंबावर गंभीर आणि चुकीचे आरोप केले जात असल्याचा दावा धंगेकरांनी केला आहे.

US China Trade Conflict 2025: 100% तारीफ वरून चीन अमेरिकेत जुंपली; अमेरिकेची धमकी तर चीनच ही प्रतिउत्तर

धंगेकरांनी या सर्व प्रकारामागे भाजपचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, भाजप नेत्यांना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे आहेत. त्यांच्यावर ‘मकोका’ (Dhangekar Son Viral Photo Controversy) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन आहे आणि त्यासाठी चार-पाच लोकांना उभे केले जात आहे. इतकेच नव्हे तर, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यामार्फत त्यांना ‘तडीपार’ करण्याचा कट रचत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. निलेश गायवळ प्रकरणावरून भाजपला घेरणाऱ्या धंगेकरांना अडकवण्यासाठी भाजपने त्यांच्या मुलाचे फोटो व्हायरल करून वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर निशाणा साधल्याचे चित्र या निमित्ताने उभे राहिले आहे. धंगेकरांनी या षडयंत्राचा सामना करण्याची तयारी दर्शवत, भाजपच्या या ‘कौटुंबिक हल्ल्या’ला राजकीय उत्तर देण्याचे संकेत दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!