Nilesh Ghaywal Blue Corner Notice: पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. याच धर्तीवर, पुणे (Nilesh Ghaywal Blue Corner Notice) पोलिसांनी कुख्यात घायवळ टोळीच्या दहा सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, म्हणजेच ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या टोळीचा म्होरक्या नीलेश घायवळ हा पोलिसांना गुंगारा देऊन विदेशात पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. नीलेश घायवळ हा कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान घायवळ परदेशात पळून गेल्याचे उघड झाल्यानंतर पुणे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्याला भारतात परत आणण्यासाठी शहर पोलीस युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीसाठी इंटरपोलला पत्र लिहिले होते. पोलिसांच्या विनंतीला प्रतिसाद देत इंटरपोलने *(Nilesh Ghaywal Blue Corner Notice) आता नीलेश घायवळविरुद्ध ‘ब्लू कॉर्नर’ (Blue Corner) नोटीस जारी केली आहे. गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी, त्यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी आणि त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ही नोटीस जारी केली जाते. या नोटीसमुळे घायवळचा शोध आता केवळ पुणे किंवा भारतापुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाला आहे.
PCMC NEWS: पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमातील संशयावरून प्रियकराने प्रेयसीला वाढदिवसाच्या दिवशी संपवलं
घायवळला चौफेर घेरण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पुणे पोलिसांनी यापूर्वीच कोथरूड येथील त्याच्या मालमत्तेवर छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी (Nilesh Ghaywal Blue Corner Notice) मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू, दोन जिवंत काडतुसे आणि अनेक जमिनींशी संबंधित अनधिकृत कागदपत्रे जप्त केली होती. या कारवाईमुळे घायवळला आर्थिक आणि कायदेशीर अशा दोन्ही बाजूंनी मोठा फटका बसला आहे.
नीलेश घायवळ हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झाल्याने त्याच्या टोळीचे कंबरडे मोडले आहे. आता इंटरपोलने ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केल्यामुळे, परदेशात लपून बसलेल्या नीलेश घायवळचा शोध लवकरच लागण्याची शक्यता वाढली आहे. पुणे पोलीस आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नातून त्याला लवकरच न्यायव्यवस्थेसमोर हजर केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.