Hinjewadi Road Safety Protest: Hinjewadi Residents Raise Their Voice for Safer Roads – Strong Protest Against Administrative Negligence

Hinjewadi Road Safety Protest: रस्ते सुरक्षिततेसाठी हिंजवडीकरांचा एल्गार; प्रशासनाच्या निष्काळजीपणा विरुद्ध नागरिकांचे तीव्र आंदोलन

124 0

Hinjewadi Road Safety Protest: हिंजवडी, माण आणि मारुंजी येथील रहिवासी व आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांनी आज, शनिवारी सकाळी एकत्र येत रस्ते (Hinjewadi Road Safety Protest) सुरक्षा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत शांततापूर्ण आंदोलन केले. शुक्रवारी पांडव नगर येथे मिक्सर ट्रकने चिरडल्याने झालेल्या अपघातात भारती मिश्रा (वय ३४, रा. थेरगाव) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हे आंदोलन छेडले. हिंजवडी फेज १ मधील ‘स्ट्रीट्स ऑफ युरोप मॉल’ समोर २०० हून अधिक रहिवासी, ज्यात कुटुंबे, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी वाहतूक नियमांची ढिलाई आणि रस्त्यांची दयनीय अवस्था याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

OLA UBER RULES NEWS: ॲप-आधारित वाहतुकीसाठी महाराष्ट्राचे नवे नियम – सुरक्षा आणि शिस्त अग्रस्थानी

‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ याचिकेचे प्रतिनिधित्व करणारे सचिन लोंढे म्हणाले, “काल ज्या महिलेचा मृत्यू झाला, तिच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी (Hinjewadi Road Safety Protest) आहोत. आमची मागणी स्पष्ट आहे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योग्य पायाभूत सुविधा आणि वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी सुनिश्चित करावी.”

ROHIT PAWAR ON NILESH GHAIWAL & BJP : निलेश घायवळसोबत गंभीर संबंध असल्याचा भाजपचा आरोप UNCUT 

आंदोलकांनी आरोप केला की PMRDA सह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार सांगूनही सुरक्षेच्या जुन्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. लोंढे म्हणाले, “मागील काही महिन्यांत (Hinjewadi Road Safety Protest) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिल्यानंतरही रस्त्यांची सुरक्षितता सुधारलेली नाही.”
ऑगस्ट २०२५ मध्ये अशाच एका मिक्सर ट्रकच्या अपघातात जीव गमावलेल्या ११ वर्षीय प्रत्यूषा संतोष बोरटे ची आई वैशाली बोरटे यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी स्थानिक पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. त्यांनी माध्यमांना सांगितले, “हिंजवडी पोलीस आम्हाला ‘जा, पुन्हा या’ असे सांगून टाळतात. अवजड वाहनांवर बंदी असतानाही ट्रक बिनदिक्कत फिरतात. ही अंमलबजावणी आणि उत्तरदायित्वाची मोठी कमतरता आहे.”

India Post Diwali parcel service: भारतीय डाक घरचा नवा उपक्रम; १०० हुन अधिक देशात माफक दारात फराळ पाठवता येणार

नागरिकांची मागणी आहे की, अधिकाऱ्यांनी केवळ अपघातास कारणीभूत चालकांनाच नव्हे, तर ही वाहने चालवणाऱ्या आणि नियंत्रण ठेवणाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करावी. सुमारे दोन तास सकाळी १० वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होते. दिवाळीनंतर रस्ते सुरक्षा आणि नागरिकांचे हक्क यावर अधिक व्यापक आंदोलन करण्याची योजना आखली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
याव्यतिरिक्त, रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हिंजवडीतील मेगापोलिस सर्कल येथे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या सहभागाने दुसरे आंदोलन होणार असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!