OLA UBER RULES NEWS: Maharashtra’s new rules for app-based transport – Safety and discipline take priority

OLA UBER RULES NEWS: ॲप-आधारित वाहतुकीसाठी महाराष्ट्राचे नवे नियम – सुरक्षा आणि शिस्त अग्रस्थानी

133 0

OLA UBER RULES NEWS:  महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी महाराष्ट्र मोटार वाहन ॲग्रिगेटर नियम, २०२५ चा मसुदा जारी केला आहे. यामुळे ओला, उबर (OLA UBER RULES NEWS) आणि रॅपिडो सारख्या ॲप-आधारित टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा सेवा प्रथमच राज्याच्या नियमांखाली औपचारिकपणे आणल्या जाणार आहेत. या नवीन नियमांचा उद्देश भाड्याचे दर प्रमाणित करणे आणि ॲग्रिगेटर सेवांवर योग्य देखरेख ठेवणे हा आहे.

India Post Diwali parcel service: भारतीय डाक घरचा नवा उपक्रम; १०० हुन अधिक देशात माफक दारात फराळ पाठवता येणार

मसुदा नियमांनुसार, टॅक्सी राईड्ससाठीचे मूलभूत भाडे महाराष्ट्र मोटार वाहतूक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरांशी जोडले जाईल, जे प्रति किलोमीटर २२.७२ रुपये (OLA UBER RULES NEWS) इतके असेल. ऑटो-रिक्षा ॲग्रिगेटरचे भाडे प्रति किलोमीटर १७.१४ रुपये निश्चित करण्यात आले आहे. या नियमांमुळे भाड्यामध्ये विशिष्ट वेळेनुसार बदल होऊ शकणार आहेत. मागणी कमी असताना, टॅक्सी भाडे १७ रुपये प्रति किलोमीटरपर्यंत खाली येऊ शकते, तर जास्त मागणीच्या वेळेत ते वाढून ३४ रुपये प्रति किलोमीटर पर्यंत पोहोचू शकते. ऑटो रिक्षाचे भाडे पिक अवर्समध्ये २५.७ रुपये प्रति किलोमीटर पर्यंत वाढेल, तर कमी मागणीच्या वेळेत १२.८६ रुपये प्रति किलोमीटरपर्यंत कमी होऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, कायदे आणि न्याय विभागाने या मसुद्याला मंजुरी दिल्यानंतर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. “नियम (OLA UBER RULES NEWS) अंतिम करण्यात आले असले तरी, १७ ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक सूचना आणि आक्षेप परिवहन आयुक्तांच्या कार्यालयात सादर करण्यासाठी आम्ही जनतेला आमंत्रित करत आहोत,” असे त्यांनी नमूद केले. अतिवृष्टीसारख्या संकटाच्या काळात ॲप-आधारित टॅक्सींचे सर्ज प्राइसिंग २,००० ते २,५०० रुपयांपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत भाड्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. “आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांचे अशा अवाजवी दरांपासून संरक्षण करण्यासाठी सरकारी देखरेख आवश्यक आहे,” असे सरनाईक म्हणाले. या भाडे संरचनेवर काही प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. एका नियमित उबर आणि ओला वापरकर्त्याने सांगितले, “मागणीनुसार गतिमान भाडे निश्चित करण्याचे स्वातंत्र्य ॲग्रिगेटर्सना असावे. दर निश्चित केल्यास सामान्य वापरकर्त्यांसाठी रोजच्या राईड्स अधिक महाग होऊ शकतात.

Traffic Police e-Challan Maharashtra: राज्य सरकारकडून वाहतूक पोलिसांच्या इ-चलन प्रक्रियेवर नवा आदेश: खाजगी मोबाईल वापरावर बंदी

या नियमांनुसार चालक आचरणासाठी कठोर उपाययोजना निश्चित केल्या आहेत. प्रवाशांनी आरटीए कडे केलेल्या तक्रारींमुळे चौकशीच्या निकालानुसार चालकाला सेवेतून तात्पुरते किंवा कायमस्वरूपी ऑफ-बोर्ड केले जाऊ शकते. सरासरी दोन ताऱ्यांपेक्षा कमी रेटिंग असलेल्या चालकांना सेवेवर परत येण्यापूर्वी सुधारात्मक प्रशिक्षण घेणे बंधनकारक असेल. आरटीओ सर्व चालक-संबंधित तक्रारी चौकशीनंतर दहा दिवसांच्या आत सोडवणार आहे.

दरम्यान, ‘गिग वर्कर्स फ्रंट ऑफ इंडिया’ने या नवीन धोरणाच्या त्वरित अंमलबजावणीसाठी ९ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी एक दिवसाचा संप पुकारला होता. या संपामुळे पुण्यात टॅक्सी सेवांवर लक्षणीय परिणाम झाला, तर मुंबई आणि नाशिकमध्ये अंशतः यश मिळाल्याचे फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या नियमांमुळे आता महाराष्ट्र राज्यामध्ये ॲप-आधारित वाहतूक सेवा अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध होण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!