UNION MINISTER RAKSHA KHADSE PETROL PUMP NEWS: केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या (UNION MINISTER RAKSHA KHADSE PETROL PUMP NEWS) मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर-बोदवड चौफुली जवळ असलेल्या या ‘रक्षाबंधन पेट्रोल पंप’ या ठिकाणी हा गंभीर प्रकार घडला. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्री सुमारे साडेदहा वाजता ही घटना घडली. त्यावेळी पेट्रोल पंपावर दोन कर्मचारी कामावर होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोटरसायकलवरून आलेल्या चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला चढवला. त्यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावून धमकावले आणि त्यांना पंपावरील केबिनमध्ये घेऊन गेले.
दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांकडील मोबाईल आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम हिसकावून घेतली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी केबिनमधील (UNION MINISTER RAKSHA KHADSE PETROL PUMP NEWS) कॉम्प्युटर आणि इतर साहित्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. चोरी केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने, दरोडेखोरांनी पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर सोबत घेऊन पळ काढला. या घटनेत अंदाजे एक लाखांच्या आसपास रोकड आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे.
NILESH GHAIWAL LAWYER:निलेश घायवळचा कोथरूड गोळीबार प्रकरणाशी काहीही संबंध नाही
या घटनेनंतर पंपावरील कर्मचाऱ्यांनी संपूर्ण हकीगत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, दरोडेखोरांचा (UNION MINISTER RAKSHA KHADSE PETROL PUMP NEWS) शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान, या घटनेवर माजी मंत्री तथा विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा पेट्रोल पंप त्यांची सून आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा आहे. ‘या घटनेने जळगाव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. सत्तेतील एका मंत्र्याच्याच मालमत्तेवर दरोडा पडणे, हे गंभीर असून यामुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरोडेखोरांना लवकर अटक करून जळगाव जिल्ह्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून आणि राजकीय नेत्यांकडून जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत.