Bhide Bridge Reopening Pune: दिवाळी सणाच्या तोंडावर मध्यवर्ती पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी एक मोठा (Bhide Bridge Reopening Pune) दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शहरातील महत्त्वाचा दुवा असणारा भिडे पूल ११ ऑक्टोबर २०२५ पासून वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे.
‘महा-मेट्रो’च्या विकासकामांसाठी, विशेषतः डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी केबल पुलाच्या बांधणीसाठी भिडे पूल काही दिवसांपासून बंद ठेवण्यात (Bhide Bridge Reopening Pune) आला होता. त्यामुळे विश्रामबाग आणि डेक्कन परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण आला होता. नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागत असल्याने दररोज मोठी कोंडी अनुभवावी लागत होती. मात्र, आता अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आल्यामुळे मध्य पुण्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळणार आहे. या सणासुदीच्या गर्दीच्या काळात वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान ठेवण्यासाठी पोलिसांनी हा पूल तात्पुरता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
CHATRAPATI SAMBHAJI NAGAR DOG BITE NEWS: कुत्र्याच्या चाव्याने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी या संदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, ११ ऑक्टोबर २०२५ पासून भिडे पुलावरील (Bhide Bridge Reopening Pune) वाहतूक दररोज सकाळी ६:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही वेळेची मर्यादा लागू राहील. विश्रामबाग आणि डेक्कन वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहनधारकांना सुरक्षित आणि जलद वाहतुकीचा अनुभव घेता यावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
या निर्णयामुळे जंगली महाराज रोडवरून नदीपात्रातील रस्ता ओलांडून डेक्कन किंवा शनिवारवाड्याकडे जाणाऱ्या तसेच अलका टॉकीज चौकातून नदीकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणेकरांना थेट डेक्कनमधून पेठांकडे आणि पेठांतून डेक्कनकडे कमी वेळेत पोहोचणे शक्य होईल.
उत्सवाच्या काळात पुलावर होणारी गर्दी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना विशेष सूचना दिल्या आहेत. सर्व वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात होणारे संभाव्य विलंब टाळण्यासाठी प्रवासाचे मार्ग आणि वेळेचे नियोजन आगाऊ करावे, असा सल्लाही वाहतूक शाखेने दिला आहे. हा तात्पुरता दिलासा पुणेकरांची दिवाळीची खरेदी आणि दैनंदिन प्रवास निश्चितच सुकर करेल यात शंका नाही.