Arrest

पुणे रेल्वे स्थानकावर बॉंब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांना अटक

448 0

पुणे – नियंत्रण कक्षाला फोन करून पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉंब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३ मे ) सायंकाळी चारच्या दरम्यान उघडकीस आली होती. दोघा आरोपीना वाघोली, रांजणगाव एमआयडीसीमधून ताब्यात घेण्यात आले.

सूरज मंगतराम ठाकूर (वय ३०, रा. नशेली, ता. मुखेरिया, जि. होशियार, पंजाब) आणि करण भिमाजी काळे (वय ३३, रा. नावरे, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) इरफान शेख यांनी चार पोलीस पथकांच्या माध्यमातून तपास सुरू केला. दरम्यान, तांत्रिक विश्लेषणच्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, लक्ष्मी कांबळे, सुनील कदम, अमरदीप साळुंके, संतोष जगताप, सचिन राठोड, रुपेश पवार, अमित गवारी, उदय चिले, संदीप काटे, माधव केंद्रे पन्हाळकर यांनी वाघोलीतून एकाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे दोन मोबाईल मिळून आले. त्या मोबाईलवरून दहशत पसरविणारा कॉल केल्याचे त्याने कबुल केले. त्यानुसार त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन दोघांना अटक केली.

Share This News
error: Content is protected !!