Kolhapur Car Accident Miracle Survival: Car Falls 400 Feet into Gorge; Couple Miraculously Survives!

Kolhapur Car Accident Miracle Survival: 400 फूट खोल दरीत गाडी कोसळली; चमत्कारिकरीत्या वाचले दांपत्य!

95 0

Kolhapur Car Accident Miracle Survival: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एक हृदयद्रावक पण चमत्कारिक अशी घटना समोर आली आहे. सातेरी (Kolhapur Car Accident Miracle Survival)  महादेवाचे दर्शन घेऊन परत येत असताना एका चारचाकी गाडीने थेट 400 फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात घडला. मात्र चमत्कार म्हणजे या भीषण अपघातातून दांपत्य दोघेही जीवंत बचावले आहेत.

Pune Diwali Firecracker Ban: पुणे पोलिसांची फटाक्यांवर बंदी, रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना मनाई

ही घटना सोमवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास घडली. कोल्हापूरच्या पाचगाव प्रगती कॉलनीतील दत्तात्रय रघुनाथ पवार आणि त्यांची पत्नी अश्विनी हे सातेरी (Kolhapur Car Accident Miracle Survival) महादेवाचे दर्शन घेऊन परत येत होते. वाघोबा वाडी ते आणुशी मार्गावरील मिठाईचा दरा परिसरात त्यांच्या चारचाकी गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट 400 फूट खोल दरीत कोसळली. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा अक्षरशः चुराडा झाला, मात्र नियतीच्या जोरावर हे दांपत्य गंभीर जखमी अवस्थेतही जीवंत राहिले.

घटनेनंतर मोबाईल नेटवर्क नसल्याने आणि रात्री अंधार असल्यामुळे मदत वेळेवर पोहोचू शकली नाही. दोघेही संपूर्ण रात्र दरीत जखमी अवस्थेत तडफडत राहिले. पहाटे (Kolhapur Car Accident Miracle Survival) व्यायामासाठी गेलेल्या स्थानिक तरुणांच्या कानावर दरीतून मदतीचा आवाज गेला, आणि त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. स्थानिक युवकांनी साखळी पद्धतीने दरीत उतरून या दोघांना वर काढले आणि तातडीने रुग्णवाहिका बोलावली.

YERWADA POLICE STATION: येरवड्यात भरदिवसा घरात घुसून आई आणि मुलावर तलवारीने वार

जखमींना गंभीर अवस्थेत कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पवार कुटुंब घरी न पोचल्याने त्यांच्या नातेवाईकांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि सकाळी गाडी दरीत सापडल्याने अपघात झाल्याचे स्पष्ट झाले.

Hinjewadi IT Company Employee Harassment: हिंजवडी आयटी पार्कमध्ये कर्मचारी छळ प्रकरण : जबरदस्तीने राजीनामे घेण्याचा आरोप, संघटनांकडून कारवाईची मागणी

घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. सातेरी घाट मार्गावर सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अशा अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने या घाटावर सुरक्षाकवच, कठडे आणि चेतावणीफलक उभारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!