Navi Mumbai Airport Inauguration: नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे. पंतप्रधान पुढील दोन दिवस (Navi Mumbai Airport Inauguration) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्या दरम्यान मोदी नवी मुंबई विमानतळा बरोबरच मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे देखील उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्हीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सह जेष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहणार आहेत.
SANTOSH BANGAR VISIT: संतोष बांगर स्वतः ट्रॅक्टर चालवत पोहोचले शेतात: पाहा नेमकं कारण काय ?
नवी मुंबई विमानतळावरून सर्वप्रथम पंतप्रधानांचे विमान उडणार आहे. या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी देण्यात येणार आहे. आज उद्घाटन (Navi Mumbai Airport Inauguration) झाले तरीसुद्धा विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फायदा नवी मुंबईसह, ठाणे, मुंबई व पुण्याला देखील होणार आहे.
PUNE KOTHRUD: कोथरूड-बावधन भागातील नागरिकांना व्हायरल फ्लू; दूषित पाण्याची तपासणी
कार्यक्रमाची रूपरेषा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वी काही लोक कलेचे कार्यक्रम सादर केले जातील. सिडको महामंडळ आणि आता मी उद्योग समूहाकडून (Navi Mumbai Airport Inauguration) महाराष्ट्राच्या लोककलेच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. लावणी दहीहंडी नृत्याविष्कार गोंधळी जेल कॅन्सर ठेका आदिवासी आणि आगरी कोळी नृत्य चे कार्यक्रम यावेळी रंगणार आहेत.
NAVNATH BAN ON UDDHAV THACKERAY: पक्षचिन्हावरून नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं
नव्या विमानतळाची वैशिष्ट्ये
या विमानतळासाठी एक लाख कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. विमानतळ 1160 हेक्टर मध्ये उभारले आहे. जगातील सर्वात मोठे विमानतळ असलेलं लंडनमधील हिर्थो विमानतळाशी या नव्या विमानतळाची तुलना केली जात आहे. या विमानतळाला दोन रेल्वे आहेत. पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. या विमानतळावर 350 एअरक्राफ्ट ची पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. या टर्मिनल मधून डिजिटल आर्ट च्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडेल. या नव्या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील 70 टक्के लोड कमी होणार आहे.
आज कशाचे उद्घाटन?
नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन
पुणे मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण
मेट्रो लोकल आणि बसचे तिकीट मुंबई वन या एकाच ॲपवर काढता येणार
अल्प कालावधीच्या रोजगारक्षण कार्यक्रमांचा मोदींच्या हस्ते प्रारंभ
ब्रिटनचे पंतप्रधान किव्ह स्टार्मर यांच्यासह व्यापाऱ्यावर चर्चा करणार