PUNE KOTHRUD: पुणे शहरातील बावधन आणि कोथरूड परिसराला दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथीच्या आजारांच्या संकटाने वेढले आहे. (PUNE KOTHRUD) बावधन परिसर, भुसारी कॉलनीचा काही भाग, वेदभवन परिसर आणि मोकाटे नगर यांसारख्या विशिष्ट भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. अनेकांना व्हायरल फ्लूची लक्षणे दिसत असून, सर्दी, खोकला, थंडी, ताप, उलट्या आणि जुलाब अशा गंभीर आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
स्थानिकांच्या मते, हे आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पुणे महानगरपालिकेकडे या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
WALMIK KARAD VIRAL POSTER: वाल्मीक कराड जेलमध्ये आणि बाहेर वसुली सुरू? व्हायरल पोस्टरने खळबळ
मनसेच्या मागणीनुसार, पाणी निर्जंतुकीकरण संदर्भात योग्य ती दक्षता घेऊन तातडीने फिरता दवाखाना पाठवावा, जेणेकरून समस्याग्रस्त नागरिकांची तपासणी आणि (PUNE KOTHRUD) औषधोपचार त्वरित करता येतील. तसेच, मनपाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने तातडीने समन्वय साधून या भागांना शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
NILESH GHAIWAL PASSPORT:निलेश घायवळसह मदत करणाऱ्या दोघांविरोधात कोथरूड पोलिसांनी केला गुन्हा दाखल
या मागणीच्या आणि नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, पुणे मनपाच्या पथकाने आज संबंधित भागात जाऊन पाण्याचे नमुने घेतले आहेत. या नमुन्यांचे अहवाल (PUNE KOTHRUD) लवकरच येतील, ज्यामुळे पाण्याचे दूषित होण्याचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली टिळेकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. “पाणी उकळून आणि गाळून प्यावे,” असे त्यांनी नागरिकांना सांगितले आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर पुढील उपाययोजना तातडीने केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. मनपाच्या अहवालानंतरच या संकटावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजनांची दिशा निश्चित होईल.