WALMIK KARAD VIRAL POSTER: “वाल्मिकअण्णा कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य महत्त्वाचे आहे. थोडीशी मदत अण्णासाठी, (WALMIK KARAD VIRAL POSTER) आपल्या स्वाभिमानासाठी अशा आशयाचे बॅनर्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेमके हे बॅनर कुणी लावले आणि हे बॅनर लावण्यामागचा नेमका काय उद्देश आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे बॅनर झळकलं होतं. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. (WALMIK KARAD VIRAL POSTER) त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हा वाद संपत असतानाच पुन्हा वाल्मिकचे दोन बॅनर समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. यातील एका बॅनरवर वाल्मिक कराडला मदत करा म्हणून आवाहन करण्यात आले आहे.वाल्मिक अण्णा कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा. तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील थोडीशी मदत. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी.’अशा मजकुराचे हे बॅनर समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
बॅनरबरोबरच फोन पे चे स्कॅनर देखील लावण्यात आले आहे. जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचे आहे. संदिप तांदळे याने आमदार सुरेश धस, (WALMIK KARAD VIRAL POSTER) आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिली होती. एवढेच नाही तर सावरगाव येथील भगवान गडावर याच संदीप तांदळे याने वाल्मिक कराडचा फोटो झळकावला होता.संदीप तांदळे याने या प्रकरणात बोलताना सांगितलं की “मला बदनाम करण्यासाठी आणि मला गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी हे बनावट बॅनर व्हायरल केलं जातं आहे..असा आरोप तांदळे यांनी केला..हे बॅनर कोणी तयार केले त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भगवान गड प्रशासनाने केली आहे. याप्रकरणी अंमळनेर पोलिसात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
SANTOSH BANGAR DRIVING TRACTOR: आमदार संतोष बांगर स्वतः ट्रॅक्टर चालवत पोहोचले शेतात
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांना समर्थन देणारे हे पोस्टर “We Support Anna, कराड आमचे दैवत” अशा आशयाचे पोस्टर होते.आता तर चक्क वाल्मीक कराड याच्या नावे मदत मागितली जातं आहे.त्यामुळे बीडचे राजकारण कुठल्या दिशेने जात आहे, याचा लोकांनी विचार करावा, अशी चर्चा सुरु आहे.खून आणि खंडणी प्रकरणातल्या आरोपी वाल्मिक कराडचे खुलेआम समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होतं आहे.