Shankhnad World Record Pune: पुणे शहराने पुन्हा एकदा आपला सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ठसा उमठवत ऐतिहासिक सोहळा अनुभवला. स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर (Shankhnad World Record Pune) ‘शंखनाद विश्वविक्रम सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात १ हजार १११ शंखवादकांनी एकाच वेळी, एकाच ठिकाणी शंख वादन करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’मध्ये आपलं नाव अजरामर केलं.
केशव शंखनाद पथकाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात एकूण १ हजार ४०० शंखवादकांनी सहभाग घेतला, मात्र १,१११ शंखवादकांचे एकत्रित वादन (Shankhnad World Record Pune) अधिकृत विक्रम म्हणून नोंदले गेले. हा संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, नादमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. ‘ब्रह्मनाद’, ‘सप्तखंड’, ‘अर्धवलय’, ‘तुतारी’, ‘पूर्णवलय’, ‘सुदर्शन’ आणि ‘मुक्तछंदनाद’ अशा सात नादांद्वारे आणि तीन पवित्र मंत्रांच्या उच्चाराने सोहळ्याची सांगता झाली.
SUPRIYA SULE ON NILESH GHAYWAL PASSPORT SUPPORT : निलेश घायवळला पासपोर्ट देणारी ‘अदृश्य शक्ती’ कोण?
या कार्यक्रमास महंत योगी रोहतास नाथ महाराज, डॉ. चेतनानंद महाराज, मंत्री चंद्रकांत पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, विश्व हिंदू (Shankhnad World Record Pune) परिषदेचे किशोर चव्हाण, तसेच दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे सुनील रासने यांची उपस्थिती लाभली. सुषमा नार्वेकर (वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया प्रतिनिधी) यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विक्रमाची नोंद केली व प्रमाणपत्र प्रदान केले. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हा केवळ विक्रम नाही, तर भारतीय संस्कृतीचा नाद आहे. या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू करावेत.
Dussehra Vehicle Sales Pune 2025: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शहरात साडेनऊ हजार वाहनांची विक्रमी खरेदी
पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांनी सांगितले की, हा सोहळा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंती, संत तुकाराम महाराजांच्या ३७५व्या वैकुंठगमन, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित केला होता. या भव्य शंखनादाने पुणे शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा घडवून आणला.