GAUTAMI PATIL ACCIDENT CASE: Was Gautami Patil's driver not drunk? What does Sassoon Hospital's preliminary report say?

GAUTAMI PATIL ACCIDENT CASE: गौतमी पाटीलचा ड्रॉयव्हर मद्यधुंद नव्हता? ससून हॉस्पिटलचा प्राथमिक अहवाल काय सांगतो?

87 0

GAUTAMI PATIL ACCIDENT CASE: पुण्यातील नवले ब्रीजजवळ 30 सप्टेंबर रोजी झालेल्या अपघात प्रकरणामुळे सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली (GAUTAMI PATIL ACCIDENT CASE) आहे. गौतमीच्या कारने हॉटेलसमोर उभ्या असलेल्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील चालक आणि अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

Toxic Coldrif Syrup Incident in India: कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू: देशभरात खळबळ; तपास सुरू

ही गाडी गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने सिंहगड रोड पोलीस स्टेशनने गौतमीला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याकरिता नोटीस (GAUTAMI PATIL ACCIDENT CASE) पाठवली आहे. मात्र, अद्याप तिने पोलीस स्टेशनला भेट दिली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून समोर आली आहे. यामुळे अपघाताच्या चौकशीला आणखी गती देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पिंजरा फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वैद्यकीय अहवालातुन महत्वाचा खुलासा

अपघातानंतर जखमींच्या कुटुंबीयांनी गौतमीच्या ड्रायव्हरने मद्यसेवन केले असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. मात्र, आता या आरोपांवर ससून हॉस्पिटलचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल समोर आला आहे, ज्याने पोलिसांना धक्कादायक रिपोर्ट दिला आहे.
या प्राथमिक अहवालानुसार, अपघाताच्या वेळी ड्रायव्हरने मद्यसेवन केले नव्हते. ड्रायव्हरच्या श्वासात मद्याचा वास येत नव्हता आणि त्याचे बोलणे स्थिर होते, असे (GAUTAMI PATIL ACCIDENT CASE) स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. ड्रायव्हरच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले होते, ज्यातून हे सिद्ध झाले आहे की तो दारूच्या नशेत नव्हता. या रिपोर्टमुळे ड्रायव्हरवरील मद्यसेवनाच्या आरोपाचे धुके दूर झाले आहे, परंतु अपघाताच्या कारणाचा अधिक तपास करणे आता महत्त्वाचे बनले आहे.

या अपघाताच्या चौकशीसाठी विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अपघातानंतर गौतमीची कार टोईंग व्हॅन आणून घटनास्थळावरून लगेच हलवण्यात आली होती, ती व्हॅन कोणी आणली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. याशिवाय, अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील गाडीत होती की नाही, याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी सांगितल्यानुसार, अपघाताच्या वेळी फक्त ड्रायव्हरच गाडी चालवत होता आणि गौतमी गाडीत नव्हती. मात्र, जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलला अटक करण्याची आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणाच्या पारदर्शक तपासाची ग्वाही पोलीस प्रशासनाने दिली आहे.

PMC ELECTION FINAL DRAFT WORD: पुणे महानगरपालिकेचे अंतिम प्रभाग रचना जाहीर; कोणत्या प्रभागात बदल?

गौतमी पाटील या सेलिब्रिटी असल्याने तिच्यावर कारवाई करताना चालढकल होत आहे, असा आरोपही होत आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा तपास कसा पूर्ण करतात आणि गौतमी पाटील चौकशीसाठी कधी हजर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!