Toxic Coldrif Syrup Incident India: राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपच्या सेवनामुळे १२ बालकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर संपूर्ण देशात मोठी (Toxic Coldrif Syrup Incident India: राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपच्या सेवनामुळे १२ बालकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर ) चिंता पसरली आहे. या गंभीर घटनेनंतर मध्य प्रदेश आणि तमिळनाडू येथील प्रशासनाने त्वरित हे औषध विकण्यावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
पिंजरा फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्राथमिक तपासणीत, तमिळनाडूतील कांचिपुरम येथील कोल्ड्रिफ निर्मिती करणाऱ्या श्रीसन फार्मा कंपनीच्या युनिटमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये डायथिलीन (Toxic Coldrif Syrup Incident India) राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपच्या सेवनामुळे १२ बालकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर ग्लायकॉल (DEG) या विषारी औद्योगिक रसायनाचा धोकादायक स्वरूपात उच्च स्तर आढळून आला आहे. मध्य प्रदेश सरकारने केलेल्या विनंतीनुसार तमिळनाडू अन्न आणि औषध प्रशासनाने ही तपासणी केली.
हे डीईजी आणि एथिलीन ग्लायकॉल (EG) हे औद्योगिक द्रावक असून ते अँटीफ्रीझ, ब्रेक फ्लुइड्स, रंग आणि प्लॅस्टिकमध्ये वापरले जातात. त्यांचा औषधांमध्ये वापर करणे पूर्णपणे अयोग्य आहे. काही स्वार्थी उत्पादक खर्च कमी करण्यासाठी फार्मास्युटिकल-ग्रेड घटकांऐवजी औद्योगिक-ग्रेड कच्चे साहित्य वापरतात, ज्यामुळे औषधे दूषित होतात. डीईजी हे रंगहीन आणि चिकट द्रव असल्यामुळे, प्रयोगशाळेत तपासल्याशिवाय ते ग्लिसरीनसारख्या सुरक्षित घटकांसारखेच दिसते आणि त्यामुळे हा धोका ओळखणे कठीण होते.
VIJAY KUMBHAR ON PMC PRABHAG RACHANA : गॅझेट जाहीर झाल्यानंतर मनपा निवडणुकीची प्रक्रिया जाहीर होणार
जेव्हा डीईजी किंवा ईजी शरीरात जातात, तेव्हा त्यांचे रूपांतर अत्यंत विषारी संयुगांमध्ये होते, ज्यामुळे मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेचे गंभीर नुकसान होते. विशेषतः (Toxic Coldrif Syrup Incident India) राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपच्या सेवनामुळे १२ बालकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर लहान मुलांमध्ये, याच्या सेवनानंतर काही तासांतच उलट्या होणे, मळमळणे, पोटदुखी आणि लघवी कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्वरित आणि योग्य उपचार न मिळाल्यास, तीव्र मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू ओढवू शकतो.
चेंन्दवाडा, मध्य प्रदेश येथून गोळा केलेले सहा नमुने डीईजी आणि ईजी-मुक्त असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले असले तरी, तमिळनाडूच्या युनिटमध्ये दूषितता आढळल्यामुळे कोल्ड्रिफ सिरपच्या काही विशिष्ट बॅचेसमध्ये भेसळ होण्याची भीती वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावर औषध परत घेण्याची (Recall) प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. उत्पादक कंपनी श्रीसन फार्मा याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातून सिरपचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी सुरू केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जनतेला आवाहन केले आहे की, तपासणीचे निष्कर्ष हाती येईपर्यंत या कोल्ड्रिफ सिरपचा वापर करणे पूर्णपणे टाळावे. तसेच, “कोणत्याही औषधी फॉर्म्युलेशनमध्ये डायथिलीन ग्लायकॉलची उपस्थिती आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करते. दूषितता सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशभरातील पालक आणि आरोग्य संस्थांसाठी हा एक गंभीर इशारा आहे, ज्यामुळे औषधांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.