PMC Election Final Draft: Pune Municipal Corporation's Final Ward Structure Announced; Which Wards Were Changed?

PMC ELECTION FINAL DRAFT WORD: पुणे महानगरपालिकेचे अंतिम प्रभाग रचना जाहीर; कोणत्या प्रभागात बदल?

90 0

PMC ELECTION FINAL DRAFT WORD: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली असून यावेळी एकूण ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक निवडले (PMC ELECTION FINAL DRAFT WORD) जाणार आहेत. या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली अंतरिम प्रभाग रचना ६ ऑक्टोबरला जाहीर होणार होती, मात्र ती ४ ऑक्टोबर रोजीच जाहीर करण्यात आली. या नव्या रचनेत एकूण आठ प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत, जे महापालिकेच्या भविष्यातील सत्ताकारणावर परिणाम करू शकतात.

Uddhav Thackeray Dussehra Controversy: रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृतदेहावर केलेल्या आरोपांवर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

कळस-धानोरी प्रभागाचे नाव आता कळस-धानोरी-लोहगाव (उर्वरित) असे करण्यात आले आहे. कोरेगाव पार्क-मुंढवा प्रभागाचे नाव कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा असे झाले आहे. (PMC ELECTION FINAL DRAFT WORD) मांजरी बुद्रुक-साडेसतरा नळी या प्रभागात केशवनगरचा समावेश करण्यात आला आहे. रामटेकडी-माळवाडी प्रभागामध्ये वैदुवाडी जोडण्यात आली आहे. बिबवेवाडी-महेश सोसायटी हा प्रभाग आता शंकर महाराज मठ-बिबवेवाडी असेल. कमला नेहरू हॉस्पिटल आणि रस्ता पेठ प्रभाग क्रमांक २४ चे नाव कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-के.ई.एम. हॉस्पिटल असे करण्यात आले आहे. गुरुवार पेठ-घोरपडे पेठ प्रभाग क्रमांक २६ मध्ये समताभूमीचाही समावेश करण्यात आला आहे.

नवी पेठ-पर्वती हा सर्वात लहान प्रभाग आहे, तर बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज हा सर्वात मोठा प्रभाग मानला जातो. या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर (PMC ELECTION FINAL DRAFT WORD) प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या. एकूण ५९२२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातील १३२९ हरकती पूर्णतः मान्य करण्यात आल्या, ६९ हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या आणि ४५२४ हरकती अमान्य करण्यात आल्या.

Amrut Senior Citizen Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ ₹585 मध्ये वर्षभर मोफत एस.टी. प्रवास

या सर्व बदलांमुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. विविध भागांतील स्थानिक नेतृत्व, पक्षांची तयारी आणि मतदारसंघांची रचना यामुळे प्रचाराच्या रणनीतीतही लक्षणीय बदल होऊ शकतो.

Share This News
error: Content is protected !!