प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून प्रियकराने पळवला तिचा दीड वर्षाचा मुलगा, आरोपीला अटक

597 0

पुणे- भांडणाच्या रागातून प्रियकराने प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. सहकार नगर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला शिताफीने अटक केली आणि बाळाची सुखरूप सुटका केली.

सुनील पांढरे (वय २६, पांढरेवाडी , ता. गंगाखेड, जि.परभणी ) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. राणी गुळमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील सहकारनगर परिसरात एका दीड वर्षांच्या बाळाला पळवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी काही तासांत बेड्या ठोकल्या. सहकार नगर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला शिताफीने अटक केली आणि बाळाची सुखरूप सुटका केली. सुनील पांढरे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी महिला आणि पांढरे या दोघांची बारामती येथे एका कंपनीत असताना ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध आले. फिर्यादी महिला ही विवाहित असून तिला दीड वर्षाचा मुलगा आहे. ती आपल्या पतीसोबत राहात नाही.

१ मे रोजी आरोपी पांढरे आणि फिर्यादी महिला आपल्या मुलाला घेऊन पुण्यात फिरण्यासाठी आले होते. ते सर्वजण बालाजी नगर येथील एका लॉजमध्ये थांबले होते. तिथून ते दगडुशेठ गणपती, कात्रज सर्पोद्यान, स्वामी नारायण मंदीर येथे फिरुन पुन्हा पुन्हा लॉजवर आले. ३ मे रोजी दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर सुनील पांढरे याने फिर्यादी महिलेला लॉजच्या खोलीमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षांच्या मुलाला घेऊन आरोपी पळवून घेऊन गेला

फिर्यादी महिलेने आरडाओरड केल्यानंतर लॉजच्या व्यवस्थपकाने तिची सुटका केली. त्यांनतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी तात्काळ तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता आरोपी मुलाला घेऊन बसमधून मूळ गावी जात असल्याची माहिती मिळाली. सूत्रांच्या माहितीच्या आधारे लहान मुलाला पळवून नेणारा आरोपी सुनील पांढरे हा अहमदपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक छबु बेरड व तपास पथकातील अंमलदार भुजंग इंगळे व महेश मंडलीक हे अहमदपूर येथे रवाना झाले. त्यांनी घटनास्थळवरून सुनील सोपान पांढरे याच्यासह बाळाला ताब्यात घेतले आणि सहकारनगर पोलीस स्टेशन येथे हजर झाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!