NPS NEW RULE: आज पासून NPS च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. ‘एन पी एस’ म्हणजे काय तर नॅशनल पेन्शन स्कीम, भारत सरकार पेन्शन योजना. यातील (NPS NEW RULE) नियम बदलांमुळे गुंतवणूकदारांना नवीन पर्याय मिळणार आहेत. या एन पी एस वर पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी नियंत्रण ठेवते. ही योजना 2004मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काढण्यात आली होती. पण 2009 नंतर ही सर्वांसाठी खुली करण्यात आली. या NPS गुंतवणुकीतून काय फायदा होतो? एक म्हणजे रिटायरमेंट नंतरच्या काळासाठी तुम्ही यामधून गुंतवणूक करू शकता व दुसरा म्हणजे कर बचत होते. या नियम बदलांमध्ये दोन मुख्य नियम बदल करण्यात आलेले आहेत.
Mayuresh Waghmare UPSC IES Ranker: सोलापूरच्या मयुरेश वाघमारेची गरुडझेप: UPSC IES मध्ये देशात आठवा क्रमांक!
हे नियम जे या योजनेचे सरकारी सबस्क्रायबर नाही त्यांच्यासाठी बदलण्यात आलेले आहेत. आता गुंतवणूक दारांना 100 % इक्विटी इन्व्हेस्टमेंट आणि मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (NPS NEW RULE) करता येणारे. काय आहेत हे दोन्ही बदल जाणून घेऊयात सविस्तर. जेव्हा तुम्ही NPS अकाउंट ओपन करतात तेव्हा तुम्हाला प्राण परमनंट अकाउंट नंबर मिळतो ज्याद्वारे तुम्ही पूर्वी एका टियरमध्ये एकाच योजनेमध्ये गुंतवणूक करू शकत होता. परंतु आता बदललेल्या नियमानुसार मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क म्हणजेच तुम्ही एकाच टियरमध्ये वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. शिवाय आता पेन्शन फंड वेगवेगळ्या स्तरांसाठी वेगवेगळ्या योजना लॉन्च करू शकते. गीग वर्कर्स, कॉर्पोरेट कर्मचारी, सेल्फ एम्प्लॉयी म्हणजेच बिझनेस मॅन्स यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आता पेन्शन फंड आणू शकतात. यामध्ये दोन प्रकार असतील एक असेल कमी जोखीम म्हणजेच moderate risk व दुसरा अधिक जोखीम high risk. 100% इक्विटी इन्व्हेस्टमेंट हा नियम high risk यामध्ये येतो.
Navale Bridge Accident Pune: पुण्यात गौतमी पाटील च्या गाडीचा अपघात; रिक्षाला उडवलं तीन जण गंभीर जखमी
तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार कमी किंवा अधिक रिस्क घेऊ शकता. जसं मी म्हणाले की एका डियर मध्ये एकाच योजनेमध्ये गुंतवणूक करू शकत होतात परंतु आता (NPS NEW RULE) तुम्ही एकाच वेळी तुमच्या प्राण परमनंट अकाउंट नंबर द्वारे विविध योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता कोणत्या योजनेमध्ये किती गुंतवणूक करायची हे सर्वस्वी तुम्ही ठरवू शकता. जे तुम्ही पूर्वी ठरवू शकत नव्हता पूर्वीच्या नियमानुसार तुम्हाला एका योजनेमध्ये 75 टक्के रक्कम गुंतवणे बंधनकारक होते. परंतु आता हा नियम बदलला आहे व याचा गुंतवणूकदारांना फायदा देखील होणार आहे.
NPS NEW RULE: ‘एन पी एस’ चे नवीन नियम गुंतवणूकदारांना दिलासा
कारण शेअर्सवर कसलीही मर्यादा राहिलेली नाही. शेअर्स वरील मर्यादा हटवण्यात आली आहे. तुम्ही तुमचे सर्व पैसे एनपीएस मध्ये इक्विटीद्वारे सुद्धा गुंतवू शकता जर तुमची तयारी असेल तर. पूर्वीच्या स्किमस बंद होणार नाही आहेत. त्या कॉमन स्किम म्हणून चालू राहणार आहेत. जे नवीन एनपीएस अकाउंट ओपन करतील त्यांना पंधरा वर्षासाठी त्याच्यातून एक्सिट घेता येणार नाही. पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या स्कीम मधून एक्सिट घेऊ शकता.