Mayuresh Waghmare UPSC IES Ranker: Solapur’s Mayuresh Waghmare Soars High with All India Rank 8 in UPSC IES!

Mayuresh Waghmare UPSC IES Ranker: सोलापूरच्या मयुरेश वाघमारेची गरुडझेप: UPSC IES मध्ये देशात आठवा क्रमांक!

118 0

Mayuresh Waghmare UPSC IES Ranker: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिष्ठेच्या इंडियन इकॉनॉमिक सर्विसेस (IES) परीक्षेत सोलापूरच्या मयुरेश वाघमारेने (Mayuresh Waghmare UPSC IES Ranker) नेत्रदीपक यश मिळवत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याने देशातून आठवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, या वर्षी IES साठी केवळ १२ जागा होत्या आणि महाराष्ट्रातून यशस्वी होणारा मयुरेश हा एकमेव उमेदवार आहे. यूपीएससीने जून २०२५ मध्ये घेतलेल्या या परीक्षेसाठी देशभरातील सुमारे ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी तयारी केली होती.

Navale Bridge Accident Pune: पुण्यात गौतमी पाटील च्या गाडीचा अपघात; रिक्षाला उडवलं तीन जण गंभीर जखमी

मयुरेशचे हे यश केवळ त्याचे वैयक्तिक नाही, तर त्याच्या कुटुंबाचा प्रशासकीय सेवेतील उज्ज्वल वारसा त्याने पुढे नेला आहे. त्याचे वडील भारत वाघमारे हे सध्या (Mayuresh Waghmare UPSC IES Ranker) अलिबाग येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, मयुरेशचे आजोबा अंगद वाघमारे हे देखील उपजिल्हाधिकारी होते. प्रशासकीय सेवेतील या दोन पिढ्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि अनुभवाचा वारसा मयुरेशने आयएएस (IAS) श्रेणीतील या परीक्षेत घवघवीत यश मिळवून यशस्वीपणे पुढे चालवला आहे.

मयुरेश वाघमारे याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. IES मध्ये उच्च स्थान मिळाल्यामुळे त्याची निवड (Mayuresh Waghmare UPSC IES Ranker) आता केंद्रीय वित्त मंत्रालय किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये उच्च प्रशासकीय पदावर होण्याची दाट शक्यता आहे. देशपातळीवर महत्त्वाच्या आर्थिक धोरणे निश्चित करण्याच्या कामात तो भविष्यात योगदान देईल, अशी अपेक्षा आहे. कठोर परिश्रम, अभ्यासात सातत्य आणि प्रशासकीय सेवेचा कौटुंबिक पाठिंबा यांच्या बळावर मयुरेशने हे यश संपादन केले आहे, जे महाराष्ट्रातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

Share This News
error: Content is protected !!