Aratai Chat App: The App That Will Rival WhatsApp

Aratai Chat App: व्हाट्सअप ला टक्कर देणार आराताई ॲप

67 0

Aratai Chat App: आपण सगळेच दररोज व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. पण तुम्हाला माहित आहे का की भारतासाठी खास तयार केलेलं एक देसी चॅटिंग ॲप सध्या चर्चेत आहे? हे ॲप म्हणजे (Aratai Chat App) आराताई, ज्याची निर्मिती मुंबईस्थित जुहू कॉर्पोरेशन या भारतीय कंपनीने केली आहे.

DEEPFACKE DITECTION TOOL: हे भारतीय फेक इमेज डिटेक्शन टूल माहिती आहे का?

आराताई हे ॲप व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच दिसतं आणि तसंच कार्य करतं, त्यामुळे अनेकजण याला व्हॉट्सअ‍ॅपची झेरॉक्स कॉपी असेही म्हणतात. मात्र, यामध्ये (Aratai Chat App) काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी देखील आहेत ज्या याला इतर चॅटिंग ॲप्सपेक्षा वेगळं ठरवतात. या ॲपमधून तुम्ही कॉल, चॅट, व्हिडिओ कॉल, फोटो पाठवणे, स्टेटस अपलोड करणे, आणि एक हजार सदस्यांपर्यंतचे ग्रुप तयार करणे यांसारख्या सर्व सुविधा वापरू शकता. विशेष म्हणजे, या ॲपचा कोणताही डाटा जाहिरातींसाठी वापरला जात नाही. वापरकर्त्याचा वैयक्तिक डेटा भारताच्या बाहेर न पाठवता, भारतातच सुरक्षित ठेवला जातो. त्यामुळे यामध्ये भारतीय गोपनीयता कायद्यांचे पालन करण्यात आले आहे.

प्रायव्हसीला महत्त्व देणाऱ्यांसाठी खास प्रायव्हेट चॅट मोड देखील देण्यात आला आहे. या मोडमध्ये तुम्ही सुरक्षित संवाद साधू शकता आणि तुमचा (Aratai Chat App) डाटा कुठेही लीक होणार नाही याची खात्री मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हे ॲप वापरणं खूपच सोपं आहे आणि यात कोणतीही क्लिष्टता नाही. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील वापरकर्त्यांसाठी हे सहजपणे उपयोगात आणता येणारं एक विश्वासार्ह भारतीय पर्याय ठरू शकतं.

Sarang Sathe Paula Wedding: 12 वर्षाच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर सारंग साठे आणि पाॅला अडकले लग्न बंधनात

आराताई हे केवळ चॅटिंग ॲप नसून, डिजिटल स्वावलंबनाचं प्रतीक बनू पाहत आहे. मेड इन इंडिया टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देणाऱ्यांसाठी हे ॲप एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Share This News
error: Content is protected !!