मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर अखेर आले समोर, म्हणाले..

550 0

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. ४ तारखेला पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकत्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे गायब झाले. अखेर साईनाथ बाबर आज पुन्हा रिचेबल झाले असून त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आंदोलनाचा पुढचा टप्पा पार पडणार असल्याचे स्पष्ट केले.

कायदा – सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने काल पोलिसांनी काही मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस कारवाईमुळे मला समोर येता आले नसल्याचे साईनाथ बाबर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आज दुपारनंतर मनसे पदाधिकाऱ्यांची शहर कार्यालयात बैठक होणार असल्याचे ते म्हणाले. पुढील दोन दिवसांत शहरात सह्यांची मोहीम सुरू करणार असून भोग्यांच्या संदर्भात शहरातील मौलवी आणि मुस्लिम बांधवांशी चर्चा करण्याचे नियोजन माहिती बाबर यांनी दिली. यापुढेही हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे साईनाथ बाबर म्हणाले .

मनसे नेते वसंत मोरे यांचे व्हाट्सअप स्टेटस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यांविषयीच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केलेले मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची सध्या व्हॉट्सअॅप स्टेटसची जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या पुण्याच्या दौऱ्यातही वसंत मोरे यांची अनुपस्थिती वेगळा अर्थ सांगत होती. मात्र, आता मोरे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस सुरु झाले आहे.

या स्टेटस मध्ये वसंत मोरे यांनी म्हटलं आहे की, “ज्यांच्या जीवनात संघर्ष नाही, निंदा नाही, विरोध नाही त्यांनी रस्ता बदला आपण चुकीच्या दिशेने आहोत आणि आजकाल याचे अनुभव येत आहेत” वसंत मोरे मागील दोन दिवसांपासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मनसेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यात मोरे गायब असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Share This News
error: Content is protected !!