Sarang Sathe Paula Wedding: भाडिपा फेम अभिनेता सारंग साठे न चाहत्यांना दिली गुड न्यूज. सारंग साठे व पाॅला गेल्या बारा वर्षांपासून लिव्ह इन (Sarang Sathe Paula Wedding) रिलेशनशिप मध्ये राहत होते. या बारा वर्षाच्या रिलेशनशिप नंतर अखेरीस आता त्यांनी लग्न केलं. आम्ही लग्न बंधनात अडकणार नाही असं ठरवलेलं असताना अचानक त्यांनी लग्न करून सर्व चहात्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
सोशल मीडियावर पोस्ट करत सारंग नाही माहिती दिली. सारंग आणि पाॅला यांनी 28 सप्टेंबर 2025 रोजी कॅनडामध्ये (Sarang Sathe Paula Wedding) लग्न केलं. लग्नाचे फोटो शेअर करते वेळी सारंगणे एक पोस्ट देखील केली. या पोस्टमध्ये सारंग म्हणाला, “हो आम्ही लग्न केले तुम्हा सर्वांना माहित आहे की लग्न हे आमच्यासाठी कधीच प्राधान्य नव्हतं पण आम्हाला वेगळं करू शकेल अशी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे एक कागदाची शीट. गेलं वर्ष खूप कठीण होतं जगभर संघर्ष सुरू होता. द्वेष इतका वाढला होता की पहिल्यांदाच आम्हाला वेगळं होण्याची भीती वाटली पण प्रेम नेहमीच देशावर विजय मिळवतं.”
Pune Rain Update: पुणे शहराला पावसाचा दिलासा; पण जिल्ह्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाचा इशारा
सारंग पुढे म्हणाला आमचं प्रेम आणि मैत्री जपण्यासाठी आम्ही काल म्हणजेच 28/ 09/ 2025 रोजी तो कागद घेतला. आमचं लग्न अगदी वैयक्तिक पातळीवर पार पडलं. (Sarang Sathe Paula Wedding) जवळच कुटुंब आणि फक्त मित्र-मैत्रिणी या लग्नाला उपस्थित असल्याच देखील त्यांनी या पोस्ट मधून स्पष्ट केल आहे. त्यांचे हे लग्न कॅनडामधील डीप कॉव्ह मधल्या त्यांच्या आवडत्या झाडाखाली पार पडलं. तो क्षण दोघांच्याही कुटुंबांना एकत्र येण्यासाठी परफेक्ट होता असं देखील सारंग न लिहिलय.
CM DEVENDRA FADANVIS ON OLA DUSHKAL:अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
यावेळी सारंग आणि पाॅला गाणी गायली आणि आयुष्यभर प्रियकर प्रेयसी व सर्वात जवळचे मित्र राहण्याची शपथ देखील घेतली. वेळ कितीही वाईट असली तरीही प्रेम कायम जिंकेल असा विश्वास देखील सारंग नाही या पोस्ट मधून व्यक्त केलाय.