ANDEKAR GANG| AYUSH KOMKAR| आंदेकर गँगवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल इतक्या कोटींची मालमत्ता जप्त

59 0

आंदेकर टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोक्का कायद्यांतर्गत तब्बल १७ कोटी ९८ लाख रुपयांच्या मालमत्तेची जप्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या कारवाईमुळे टोळीला मोठा आर्थिक धक्का बसला आहे.

आंदेकर कुटुंबीय, तसेच टोळीतील साथीदारांच्या ३७ बँक खात्यातील एक कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे.

 

गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा नाना पेठेत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. वनराजच्या खून प्रकरणात बंडू आंदेकरचा जावई गणेश कोमकर, मुलगी संजीवनी, तिचा दीर जयंत, तसेच सोमनाथ गायकवाडसह साथीदारांना अटक करण्यात आली होती. वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ५ सप्टेंबर २०२५ रोजी नाना पेठेतील लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीच्या आवारात गणेश कोमकर याचा वीस वर्षीय मुलगा आयुष याच्यावर बेछूट गोळीबार करुन खून करण्यात आला होता.

Share This News
error: Content is protected !!