ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यातील दैत्यनांदूरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव सभा संपन्न झालेल्या सभेपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यानंतरही लक्ष्मण हाके यांची जाहीर सभा पार पडली होती. यानंतर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना वाय प्लस दर्जा सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे या सोबतच हाके यांच्या घराबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.