BULDHANA NEWS:बुलढाण्यातील खामगाव हत्याकांड प्रकरण,हॉटेलच्या 104 नंबरच्या रूममध्ये काय घडलं?

BULDHANA NEWS:बुलढाण्यातील खामगाव हत्याकांड प्रकरण,हॉटेलच्या 104 नंबरच्या रूममध्ये काय घडलं?

75 0

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावात (buldhana couple news) घडलेले दुहेरी हत्याकांड गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे. हॉटेलच्या खोलीत सापडलेले प्रेमी युगुल… प्रियकराने केलेला प्रेयसीचा खून आणि त्यानंतर केलेलं आत्महत्या…शेवटच्या अर्ध्या तासात असं काय घडलं की प्रियकराने प्रेयसीची हत्या करून आत्महत्या केली.

बुलढाणा जिल्हा मागील तीन दिवसांपासून एका हत्याकांडाने चर्चेत आहे. खामगावात एका प्रेमी युगुल हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडलं होतं. साखरखेर्डा तालुका सिंदखेड राजा येथील साहिल दीपसिंग राजपूत वय वर्ष 23 आणि शिंदी येथील ऋतुजा पद्माकर खरात वय वर्ष 22 या प्रेमीयुगुलाने खामगाव चिखली बायपासवरील हॉटेल जुगनू मधील 104 क्रमांकाची रूम 23 सप्टेंबरला बुक केली. त्यावेळी दोघांमध्ये उद्भवलेल्या टोकाच्या वादातून ऋतुजाचा खून करून साहिलने आपले आयुष्य संपवले असं बोललं जातं आहे.सदर विद्यार्थिनी ही संध्याकाळपर्यंत गणवेशात खामगाव पॉलीटेक्निकमध्ये आपली तासिका वर्गाची दैनंदिनी पूर्ण करत होती. प्रेमी युगुलाच्या मृत्यूनंतर हॉटेल मॅनेजर विशाल सातव यांनी दिलेला तक्रारीत ही घटना संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांपासून ते 7 वाजून 50 मिनिट या वेळेत घडल्याचं नमूद केले आहे. या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यामध्ये ऋतुजाच्या छातीच्या मध्यभागी आणि शरीरावर विविध ठिकाणी असे 16 वार असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये एक वार तिच्या हातावर सुद्धा होता. यावरुन ऋतुजाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याचंही स्पष्ट होतं. तर, साहिलने स्वतःच्या छातीवरून पोटावर 6 वार केल्याचं दिसून आले.

साहिल रुमबाहेर येऊन दरवाज्यात कोसळला. हे या घटनास्थळाच्या पंचनामावरून स्पष्ट झाले. ज्या चाकूने वार केले तो जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मॅनेजरने केलेल्या तक्रारीनुसार इतक्या वेळात साहिलने ऋतुजावर तब्बल 16 आणि स्वतःवर सहा वार केले.या संपूर्ण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाची भूमिका बजावणार आहे..या घटनेवरून अनेक प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. खून करून तिसरी व्यक्ती फरार झाल्याची अफवाही पसरली होती. वास्तविक पाहता या हॉटेलमधील रूममध्ये जाण्यासाठी एकच मार्ग आहे. या मार्गावरील सीसीटीव्हीत केवळ साहिल आणि ऋतुजा जात असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीने प्रवेश केल्याचं स्पष्ट होत नाही. तसेच, प्रेमी युगल आंतरधर्मीय असल्याची अफवाही होती. तपासात हे प्रेमी युगुल आंतरधर्मीय नसून आंतरजातीय असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकंदरीतच या घटनेबाबत अनेक खुलासे सीसीटीव्ही फुटेजवरून झाले आहे. त्यामुळे पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजची महत्वाची भूमिका बजावणार आहे…

Share This News
error: Content is protected !!