Cash Seizure at Pune Railway Station: Major Action by RPF at Pune Station, ₹51 Lakh in Cash Seized

Cash Seizure at Pune Railway Station: पुणे स्टेशनवर RPF ची मोठी कारवाई: ५१ लाखांची रोख रक्कम जप्त

71 0

Cash Seizure at Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल स्थापना दिवसाच्या निमित्ताने ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत मोठी (Cash Seizure at Pune Railway Station) कारवाई करण्यात आली. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि सहायक सुरक्षा आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली RPF पुणे पथकाने नियमित तपासणी सुरू असताना एका संशयित व्यक्तीला ५१ लाख रुपयांच्या रोख रकमेसह पकडले.

SUSHMA ANDHARE ON ANJALI DAMANIA: पवार,ठाकरे आडनाव समोर असलं की अंजली दामनियांना लढण्याची शिरशिरी

ही घटना सकाळी बॅगेज स्कॅनर मशिनवर प्रवाशांच्या सामानाची तपासणी करत असताना घडली. RPF जवानांना मेहसाणा, गुजरात येथील (Cash Seizure at Pune Railway Station) रहिवासी असलेल्या फरदीनखान जफरउल्ला खान मोगल (वय २४) नावाच्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याच्याजवळ असलेल्या दोन बॅग तपासल्या असता, त्यामध्ये ५१ लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. यापैकी एका जांभळ्या रंगाच्या बॅगेत सुमारे २२ लाख रुपये आणि दुसऱ्या लाल रंगाच्या बॅगेत सुमारे २९ लाख रुपये होते.

ANMOL KEWTE: गाडीला कट लागल्याच्या रागातून अमोल केवटेला संपवलं; सोनाली भोसलेवर वार

इतकी मोठी रक्कम बाळगण्याबाबत फरदीनखानकडे विचारपूस केली असता, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे, RPF ने त्वरित आयकर विभागाला या घटनेची माहिती दिली. आयकर अधिनियम, १९६१ नुसार, जर एखाद्या व्यक्तीकडे मोठी आणि संशयास्पद रोख रक्कम आढळली आणि त्याबद्दल तो व्यक्ती (Cash Seizure at Pune Railway Station) योग्य स्पष्टीकरण देऊ शकला नाही, तर ती रक्कम आणि त्या व्यक्तीला आयकर विभागाकडे सोपवणे बंधनकारक आहे. त्यानुसार, RPF ने फरदीनखानला जप्त केलेल्या ५१ लाख रुपयांच्या रोख रकमेसह आयकर विभाग, पुणे यांच्या ताब्यात दिले आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास आयकर विभाग करत आहे.

या यशस्वी कारवाईमध्ये RPF निरीक्षक सुनील कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली ASI प्रदीप चौधरी, ASI संतोष जायभाये, ASI विलास दराडे, ASI संतोष पवार आणि MSF स्टाफ कृष्णा भांगे यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळेच ही मोठी रक्कम जप्त करणे शक्य झाले. ही कारवाई रेल्वे प्रवासादरम्यान वाढलेल्या रोख रकमेच्या अवैध वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे.

iPhone 17 Pro Max: तरुणाईच्या गळ्यातील ताईत, नेमके काय आहे खास?

रेल्वे सुरक्षा दल, पुणे, यांनी या घटनेच्या निमित्ताने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान मोठी रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नये. जर अशी वस्तू सोबत बाळगणे आवश्यक असेल, तर त्याची सर्व कायदेशीर कागदपत्रे सोबत ठेवावीत. प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा बल किंवा रेल्वे पोलीस यांना माहिती द्यावी. यासाठी हेल्पलाइन क्रमांक १३९ किंवा जवळच्या चौकीशी संपर्क साधावा.

 

Share This News
error: Content is protected !!