iPhone 17 Pro Max: The Youth’s New Obsession – What Makes It So Special?

iPhone 17 Pro Max: तरुणाईच्या गळ्यातील ताईत, नेमके काय आहे खास?

79 0

iPhone 17 Pro Max India Launch:ॲपलचा बहुप्रतिक्षित iPhone 17 Pro Max नुकताच जागतिक बाजारात आणि भारतात एकाच वेळी लॉन्च झाला आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत (iPhone 17 Pro Max India Launch) सर्वांमध्येच असलेल्या आयफोनच्या क्रेझमुळे हा नवा फोन सध्या प्रचंड चर्चेत आहे. विशेषतः, iPhone 17 Pro Max त्याच्या खास फिचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पुण्यात नुकत्याच सुरू झालेल्या ॲपल स्टोअरमध्येही हा फोन खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

Karad Mobile Shop Customer Death: कराडमध्ये मोबाईलच्या वादातून युवकाचा मृत्यू, शहरात खळबळ, काय आहे नेमकं प्रकरण ?

खास फिचर्स आणि रंगसंगती

iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max हे दोन्ही मॉडेल एकाच वेळी बाजारात आले आहेत. (iPhone 17 Pro Max India Launch)या फोनची सर्वात जास्त चर्चा त्याच्या रंग, आकार आणि स्टोरेजमुळे होत आहे.
रंग: हा फोन सिल्वर, कॉस्मिक ऑरेंज आणि डीप ब्लू या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यातील ‘कॉस्मिक ऑरेंज’ हा रंग ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे आणि याच रंगामुळे अनेकजण हा फोन खरेदी करण्यास उत्सुक आहेत.

आकार: iPhone 17 Pro ची उंची ६.२७ इंच आहे, तर iPhone 17 Pro Max ची उंची ६.५५ इंच आहे. दोन्ही मॉडेल्सचा आकार हा पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा थोडा मोठा आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळतो.

स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत ॲपलने यावेळी ग्राहकांना भरपूर पर्याय दिले आहेत. २५६GB, ५१२GB, १TB आणि २TB असे चार पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे (iPhone 17 Pro Max India Launch)

जास्त डेटा आणि ॲप्स वापरणाऱ्यांसाठी हे मॉडेल खूप सोयीचे ठरले आहे.

बॅटरी: ॲपलने यावेळी बॅटरीच्या क्षमतेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पूर्वीच्या मॉडेल्सच्या तुलनेत या फोनची बॅटरी लाईफ खूप चांगली असून, ती युजर्सना नक्कीच आनंद देईल.

Drunken Women Brawl Nashik: नाशिकमध्ये मद्यधुंद तरुणींचा राडा, भररस्त्यात गोंधळ आणि मारामारी

किंमत: भारतातील आयफोनची किंमत परदेशापेक्षा जास्त असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. भारतात iPhone 17 Pro Max ची किंमत १,४९,००० रुपये आहे, तर परदेशात तो सुमारे १,०९,००० रुपयांना उपलब्ध आहे.

परदेशात प्रत्येक शहराचा जीएसटी दर वेगळा असल्याने किमतीत हा फरक दिसून येतो. सध्या सोशल मीडियावर iPhone 17 Pro Max चे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्याचे डिझाइन आणि कार्यक्षमता अनेकांना आकर्षित करत आहे. या फोनची वाढती लोकप्रियता पाहता, तो लवकरच भारतीय बाजारात सर्वाधिक विकला जाणारा फोन ठरू शकतो.

Share This News
error: Content is protected !!