Karad Mobile Shop Customer Death: Youth Dies After Dispute Over Mobile in Karad, Incident Sparks Uproar – What Exactly Happened?

Karad Mobile Shop Customer Death: कराडमध्ये मोबाईलच्या वादातून युवकाचा मृत्यू, शहरात खळबळ, काय आहे नेमकं प्रकरण ?

82 0

Karad Mobile Shop Customer Death: कराड शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या मोबाईलचा कॅमेरा खराब (Karad Mobile Shop Customer Death) झाल्याने तो बदलून घेण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाचा मोबाईल शॉपीतील कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादातून मृत्यू झाला आहे. अखिलेश नलवडे (वय अंदाजे २५) असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कराड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Drunken Women Brawl Nashik: नाशिकमध्ये मद्यधुंद तरुणींचा राडा, भररस्त्यात गोंधळ आणि मारामारी

नेमके काय घडले?

अखिलेश नलवडे याने तीन दिवसांपूर्वी कराड बस स्थानकासमोरील एका मोबाईलच्या दुकानातून नवा मोबाईल खरेदी केला होता. मात्र, मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिघाड (Karad Mobile Shop Customer Death) झाल्याचे त्याच्या लक्षात आले. हा मोबाईल बदलून घेण्यासाठी तो शुक्रवारी रात्री आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा दुकानात गेला. जेव्हा अखिलेश आणि त्याचे मित्र दुकानात पोहोचले, तेव्हा दुकानात फरशी पुसण्याचे काम सुरू होते. अखिलेशच्या चपलांमुळे फरशी पुन्हा खराब झाली. याच छोट्याशा कारणावरून अखिलेश आणि दुकानातील कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता, पण काही वेळातच तो विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

NASHIK POLICE CASE: नाशिकमध्ये अपहरणाचा व्हिडिओ व्हायरल, 24 तासांत आरोपी अटकेत!

झटापटीत कोसळला, मृत्यू झाला

या झटापटीदरम्यान अखिलेश जमिनीवर कोसळला. तो बेशुद्ध झाला असल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या मित्रांनी आणि उपस्थित (Karad Mobile Shop Customer Death) लोकांनी त्याला तातडीने कराड उपजिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने अखिलेशच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षुल्लक कारणावरून एका तरुणाचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

DCP NIKHIL PINGALE ON ANDEKAR CASE: आंदेकर गॅंगची बँक खाती फ्रिज, लाखोंचं घबाड जप्त

पोलिसांची कारवाई आणि तपास

या प्रकरणी कराड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. अखिलेशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी (Karad Mobile Shop Customer Death) पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.
पोलिसांनी अखिलेशशी झटापट करणाऱ्या अजीम मुल्ला नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्या चौकशीतून या घटनेमागील सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेने ग्राहक आणि दुकानदार यांच्यातील संबंधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!