Drunken Women Brawl Nashik: नाशिकमधील सिडको परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Drunken Women Brawl Nashik) सिडकोतील स्टेट बँक चौकात काही मद्यधुंद तरुणींनी मोठा गोंधळ घातला. या तरुणींनी फक्त धिंगाणाच नाही तर एका व्यक्तीची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ करत मारहाणही केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना रात्रीच्या वेळी घडली. या तरुणींनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली, ज्यामुळे आसपासच्या लोकांचे लक्ष वेधले गेले. गोंधळ वाढत असताना, त्यापैकी एका तरुणीने एका व्यक्तीची कॉलर (Drunken Women Brawl Nashik) पकडून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. अनेक लोकांनी मोबाईलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड केला, ज्यामुळे ही घटना अधिक व्हायरल झाली आहे.
गोंधळामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर, तरुणींनी फोन करून त्यांच्या साथीदारांना बोलावले. काही मिनिटांतच दुचाकींवर काही तरुण घटनास्थळी पोहोचले. (Drunken Women Brawl Nashik) त्यांनी या तरुणींची अवस्था पाहिली आणि त्यांना लगेचच दुचाकीवर बसवून तिथून घेऊन गेले. स्थानिकांनी आरोप केला आहे की, ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब केला. त्यामुळे स्थानिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी आहे. भर वस्तीत अशा प्रकारे गैरवर्तन घडल्याने परिसरात संतापाची लाट आहे.
NASHIK TRYAMBKESHWAR JOURNALIST INCIDENT: नाशिक पत्रकार मारहाणीचा अजित चव्हाण यांच्याकडून निषेध
विशेष म्हणजे, यापूर्वीही नाशिकमधील इंदिरानगर आणि गंगापूर भागात अशाच प्रकारे मद्यधुंद तरुणींनी गोंधळ घातल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून, पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात आणि भररस्त्यात असा राडा करणाऱ्यांवर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कायद्याचा धाक राहण्यासाठी अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.