NASHIK POLICE CASE: नाशिकमध्ये अपहरणाचा व्हिडिओ व्हायरल, 24 तासांत आरोपी अटकेत!

NASHIK POLICE CASE: नाशिकमध्ये अपहरणाचा व्हिडिओ व्हायरल, 24 तासांत आरोपी अटकेत!

98 0

नाशिकमध्ये ( nashik police ) काल झालेल्या अपहरणाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात सातपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तिघा सराईत आरोपींना अटक केली आहे. दिनांक १८ सप्टेंबर रोजी दुपारी एका तक्रारदारास घरातून जबरदस्तीने मारहाण करून चारचाकी वाहनात बसवून अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्याच्याजवळील मोबाईल देखील हिसकावून घेतला. या प्रकरणाचा तपास सुरू होताच सातपूर पोलिसांनी उपनगर पोलिसांच्या मदतीने अवघ्या काही तासांत आरोपींना गजाआड केले. संदीप आलोकलाल उर्फ बाबू मुक्तार मणियार, गणेश राजाराम पगार आणि विजय राजेंद्र अचचित्ते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संदीप मणियार याच्यावर यापूर्वी तब्बल सहा गुन्हे तर गणेश पगार याच्यावर दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किशोर काळे आणि सहा. आयुक्त शंकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रचिन खैरनार तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग होता. सध्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!