ALOK NATH UTTARAKHAND SCAM:उत्तराखंडमधील बहुराज्यीय सहकारी संस्था (LUCC) घोटाळ्याप्रकरणी चित्रपट अभिनेते श्रेयस तळपदे आणि (ALOK NATH UTTARAKHAND SCAM) आलोकनाथ यांच्यासह १३ जणांविरोधात रायपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही अभिनेते या कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर असल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
NASHIK IGATPURI NEWS: अवैद्य कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई
उत्तराखंड उच्च न्यायालयात बुधवारी या प्रकरणाची सुनावणी झाली, ज्यात असे समोर आले की चिटफंड कंपनीचे संचालक उत्तराखंडमधील नागरिकांचे सुमारे ८०० कोटी रुपये (ALOK NATH UTTARAKHAND SCAM) घेऊन फरार झाले आहेत. याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ज्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
देहरादूनमधील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी श्रेयस तळपदे आणि इतरांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. या चिटफंड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बनावट योजनांचे एजंट बनवून लोकांकडून ६.२७ कोटी रुपये (ALOK NATH UTTARAKHAND SCAM) गोळा केले आणि त्यानंतर कार्यालयाला टाळे लावून पसार झाले.
WHO IS NILESH GHAYWAL:कोथरूडमध्ये घायवळ टोळीची पुन्हा दहशत,टोळीचा म्होरक्या गुंड निलेश घायवळ कोण?
कंपनीने देहरादूनमध्ये सरकारी संस्था असल्याचे भासवून आठ शाखा उघडल्या होत्या. आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांना एजंट बनवले आणि त्यांच्याकडून सुकन्या योजना, आयुष्मान योजना, पेन्शन योजना, एफडी, आयपी शिक्षण योजना अशा विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे गोळा केले. या आरोपींनी गोळा केलेले ६.२७ कोटी रुपये घेऊन पोबारा केला. कंपनीच्या योजनांवर विश्वास बसावा यासाठीच या प्रसिद्ध अभिनेत्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून वापर करण्यात आला होता, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, आता सीबीआय देखील यात सहभागी होणार आहे. यामुळे भविष्यात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.