Symbisis student Accident: सिम्बायोसिस कॉलेजचे दोन बी.बी.ए. विद्यार्थी गुरुवारी पहाटे एका भीषण रस्ते अपघातात ठार झाले. देहूरोड येथील ईदगाह मैदानाजवळ बायपास रस्त्यावर (Symbisis student Accident) त्यांची कार एका कंटेनरवर आदळली.
हा अपघात सकाळी ६:४५ च्या सुमारास घडला. स्विफ्ट कारमध्ये चार विद्यार्थी होते आणि ती भरधाव वेगात कंटेनरवर आदळली. या अपघातात (Symbisis student Accident) झारखंडचा रहिवासी सिद्धांत आनंद आणि राजस्थानचा रहिवासी दिव्यराज सिंग राठोड या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
CLIMATE CHENGE: मराठवाड्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानाचा अंदाज
इतर दोन विद्यार्थ्यांवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची नावे अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत. पोलिस दिलेल्या माहितीनुसार, हे चौघेही (Symbisis student Accident) बुधवारी लोणावळ्याला फिरायला गेले होते आणि पुण्यात परत येत असताना हा अपघात घडला.
MUMBAI BANGALORE HIGHWAY वर लोणावळ्यात कारचा कसा झाला अपघात
अपघाताच्या प्राथमिक चौकशीनुसार, कंटेनरचे इंडिकेटर लाईट बंद असल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघातामुळे स्विफ्ट कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच देहूरोड पोलीस ठाण्याचे (पिंपरी चिंचवड पोलीस) अधिकारी घटनास्थळी तात्काळ पोहोचले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. या अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूने प्राध्यापक आणि विद्यार्थी दोन्ही दुःखी झाले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा लांबच्या प्रवासात वाहन चालवताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते.