Nepal interim Prime Minister Sushila Karki: सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे नेपाळमधील वातावरण तापले होते. Gen Z नी आंदोलना दरम्यान नेपाळच्या संसदेवर व देशाच्या आजी-माजी पंतप्रधानांच्या घरांवर हल्ले केले,
देशाचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या घरावर हल्ला करण्यात आला त्याचबरोबर देशाचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घरावर हल्ला करून त्यांच्या बायकोला जिवंत जाळण्यात (Nepal interim Prime Minister Sushila Karki) आले. या आंदोलनाच्या खवळलेल्या वातावरणामुळे के.पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा तात्काळ राजीनामा दिला. या अनिश्चिततेमुळे नेपाळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. व सुशीला कार्की यांना नेपाळच्या हंगामी पंतप्रधान करण्यात आलं. कोण आहेत या सुशीला कार्की ? त्यांना पंतप्रधान कोणी केलं?
पुढचा पंतप्रधान कोण होणार, यावर चर्चा करण्यासाठी एक चार तासांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली, ज्यात हजारो (Nepal interim Prime Minister Sushila Karki) लोकांनी सहभाग घेतला. या बैठकीदरम्यान, आंदोलकांनी एकमताने सुशीला कार्की यांना पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे सुशीला कार्की यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. आणि त्या नेपाळच्या हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्त झाल्या.
कोण आहेत सुशीला कार्की?
सुशीला कार्की या नेपाळच्या राजकारणातील एक महत्त्वाच्या व्यक्तिमत्व (Nepal interim Prime Minister Sushila Karki) आहेत. त्यांचा जन्म नेपाळमध्ये झाला असला, तरी त्यांचे शिक्षण नेपाळसोबतच भारतातही झाले. त्यांनी 1972 मध्ये महेंद्र मोरंग कॅम्पसमधून कला शाखेची पदवी घेतली आणि नंतर त्यांनी वाराणसीतून राज्यशास्त्राची पदव्युत्तर पदवी मिळवली. कायद्याचे शिक्षण त्यांनी नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठातून पूर्ण केले.
आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी विराटनगरमध्ये वकील म्हणून केली. त्यानंतर, त्यांनी महेंद्र मल्टिपल कॅम्पसमध्ये सहायक शिक्षिका म्हणूनही काम केले. आपल्या कठोर परिश्रमामुळे आणि प्रामाणिकपणामुळे त्या लवकरच वरिष्ठ वकील म्हणून नावारूपाला आल्या. 2010 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी कायमस्वरूपी नेमणूक झाली. जुलै 2016 ते जून 2017 या काळात त्यांनी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. त्यांच्या उत्तम नेतृत्वामुळे आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. न्यायपालिकेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांची ओळख एक अत्यंत कठोर आणि प्रामाणिक न्यायमूर्ती म्हणून आहे.
पण कर्कीच पंतप्रधान कशा झाल्या?
या निवडणुकीमध्ये सुशीला कार्की यांच्यासह कुलमान घिसिंग, सागर ढकाल आणि हरका संपांग यांसारखे तगडे उमेदवार होते. पण आंदोलकांनी सुशीला कार्की यांना पाठिंबा दिल्यानंतर, त्यांचे पारडे जड झाले. तरुण पिढीला त्यांच्या पारदर्शक आणि धाडसी नेतृत्वावर विश्वास होता. जनतेचा पाठिंबा मिळाल्यामुळे अखेरीस त्यांचीच हंगामी पंतप्रधान म्हणून निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे नेपाळमध्ये शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झाली आहे.
सुशीला कार्की यांच्यासमोर आता अनेक मोठी आव्हाने आहेत. देशातील अराजक संपवून पुन्हा शांतता प्रस्थापित करणे, देशाची आर्थिक घडी बसवणे आणि तरुणांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे, ही त्यांच्यापुढील प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. नेपाळला नवीन दिशेने नेण्यासाठी त्या कशाप्रकारे काम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल