ANDEKAR GANG MACOCA: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत असून आयुष कोमकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह सर्व आरोपींवर मकोकाअंतर्गत (ANDEKAR GANG MACOCA) कारवाई केली आहे.
आयुष कोमकर प्रकरणी आंदेकर टोळीवर मकोका
आंदेकर टोळीवर मकोका लावण्यासंदर्भात पुणे पोलिसांनी प्रस्ताव तयार केला होता ज्या प्रस्तावाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 24 तासाच्या आत परवानगी दिली असून यामुळे आंदेकर टोळीच्या अडचणी आता वाढणार आहेत.