Police Aspirant Dies Before Joining: पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न बाळगलेल्या अश्विनी केदारी (25) या होतकरू विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे. गरम पाणी अंगावर पडून (Police Aspirant Dies Before Joining) झालेल्या अपघातात गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला. हा अपघात गणपती उत्सवादरम्यान घडला, ज्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अश्विनी लवकरच पोलीस दलात रुजू होणार होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी केदारीने नुकतीच स्पर्धा परीक्षा पास केली होती. ती जानेवारीमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी जाणार होती. अश्विनी ही खेड तालुक्यातील पाळू गावची रहिवासी होती. तिच्या स्वप्नांना पंख फुटले होते. संपूर्ण कुटुंब तिच्या यशाचा आनंद साजरा करत होतं. हा अपघात गणपती उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रात्री घडला. रात्री तीनच्या सुमारास अश्विनी अभ्यासातून उठली. तिने (Police Aspirant Dies Before Joining) अंघोळीसाठी एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये इमर्शन रॉडने पाणी गरम करायला ठेवलं होतं. पण हीटर बंद करायला ती विसरली होती. यामुळे पाणी खूप जास्त गरम झालं होतं.
जेव्हा ती उठली, तेव्हा पाणी उकळू लागल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने घाईघाईत हीटर बंद केला. त्यानंतर ती ड्रमचं झाकण काढण्यासाठी गेली. त्याचवेळी उकळत्या पाण्याची वाफ तिच्या अंगावर आली. उष्णतेमुळे पाणी बाहेर सांडलं. तिचा पाय ओल्या जमिनीवर घसरला आणि ती त्यात पडली.
या अपघातात ती 80% भाजली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पुढील उपचारांसाठी तिला पिंपरीच्या डी. वाय. पाटील (Police Aspirant Dies Before Joining) रुग्णालयात हलवण्यात आलं. 11 दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
Nepal Gen Z Protest : माजी पंतप्रधानांच्या बायकोला जिवंत जाळलं; ‘जेन झी’ आंदोलकांचा हिंसाचार
अश्विनी अभ्यासात नेहमीच हुशार होती. तिने 10 वीच्या परीक्षेत 93% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर तिने मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. तिच्या मेहनतीमुळे तिला सरकारी नोकरी मिळाली होती. तिच्या कुटुंबात सरकारी नोकरी मिळवणारी ती पहिलीच व्यक्ती होती.
तिच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तिच्या जाण्याने एक गुणवान आणि होतकरू विद्यार्थिनी कायमची हरपली आहे. तिचं स्वप्न अपुरं राहिलं. तिच्या निधनाने पोलीस दलात सामील होण्याचं तिचं स्वप्न अर्धवट राहिलं. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.