राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण

510 0

मुंबई-राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. यावेळी फौजिया खान यांनी विद्या चव्हाण यांना नियुक्तीपत्र दिले. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षाची सर्व सूत्र ही विद्या चव्हाणांकडे असणार आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचा पदभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे पद रिक्त होतं. आता विद्या चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्या चव्हाण यांनी ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. महिला वर्ग त्रासला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे सांगतानाच माध्यमाकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.

सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्षपद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. यावेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!